कोर्टवर उतरण्यापूर्वी आजीचे निधन; तरी तो झुंजला!

फायनलसाठी कोर्टवर उतरण्यापूर्वी आजीचे निधन झाल्याची बातमी त्याला समजली होती. मोठ्या आणि प्रतिष्ठित स्पर्धेच्या मेगा फायनलपूर्वी मिळालेल्या धक्कादायक बातमीनंतर दु:खातून सावरत तो कोर्टवर उतरला.
Stefanos Tsitsipas And Novak Djokovic
Stefanos Tsitsipas And Novak Djokovic Twitter
Updated on

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या 22 वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपासने नंबर वन जोकोविचला कडवी झुंज दिली. पहिले दोन सेट जिंकून त्याने पहिली वहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे संकेत दिले. मात्र अखेरच्या तीन सेटमध्ये जोकोविचने त्याला मागे टाकत कारकिर्दीतील 19 व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. स्टेफानोस त्सित्सिपासचा खेळ बघणारा त्याचा फॅन निश्चितच झाला आहे. पण तो ज्या परिस्थितीत खेळता ते खूपच जिगरबाज व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवून देणारे आहे. (Stefanos Tsitsipas says grandmother died before french open final)

फायनलसाठी कोर्टवर उतरण्यापूर्वी आजीचे निधन झाल्याची बातमी त्याला समजली होती. मोठ्या आणि प्रतिष्ठित स्पर्धेच्या मेगा फायनलपूर्वी मिळालेल्या धक्कादायक बातमीनंतर दु:खातून सावरत तो कोर्टवर उतरला. एवढेच नाही तर त्याने टेनिस जगतातील अव्वलस्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला झुंजवले. कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचे कळल्यानंतरही तो ज्या जिद्दीनं खेळला ते त्याच्या कणखर मानसिकतेचे एक उत्तम उदाहरणच आहे.

Stefanos Tsitsipas And Novak Djokovic
French Open : लाल मातीत 'नोवा'समोर 'नवा हिरो' फिका पडला!

सोमवारी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत त्याने आजी गेल्याची माहिती दिली. ग्रँडस्लॅमच्या फायनलसाठी कोर्टवर उतरण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर आजीचे निधन झाल्याचे कळले. दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये तिची कोणाशीही तुलना करता येत नाही, असे म्हणत त्याने आजीला श्रद्धांजली वाहिली. 22 वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपासने अंतिम सामन्यात जोकोविचला चांगलेच तंगवले. पहिले दोन सेट आपल्या नावे करुन त्याने पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅमसाठी आतूर असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर मात्र अनुभवी जोकोविचने बाजील पलटली. अखेरचे तीन सेट जिंकत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.

Stefanos Tsitsipas And Novak Djokovic
WTC Final : विजेत्यासोबत पराभूत संघही होणार मालामाल!

फ्रेंच ओपन स्पर्धेत सर्वात कमी वयात फायनल गाठणारा स्टेफानोस त्सित्सिपास दुसरा खेळाडू आहे. 22 वर्षीय टेनिस स्टारपूर्वी लाल मातीचा राजा अशी ओळख असलेल्या राफेल नदालने कमी वयात फायनल गाठली आहे. फायनलमध्ये स्टेफानोस त्सित्सिपासने नावाला साजेसा खेळ केला. पाचव्या मानांकित टेनिस स्टारने पहिल्या दोन सेटमध्ये 18 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला चांगलेच दमवले. तो फायनलम मारेल, असेही वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात तो थोडा कमी पडला. त्याने ही स्पर्धा जिंकली नसली तरी टेनिस जगतात नव्या ताऱ्याचा जन्म झालाय, असा संदेश त्याने आपल्या खेळातून दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.