Steve Smith VIDEO : नौटंकीबाज! स्मिथ विराटची स्टाईल मारायला गेला मात्र विकेटकिपरने...

Steve Smith VIDEO
Steve Smith VIDEOESAKAL
Updated on

Steve Smith VIDEO : बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्याच्या ऑस्ट्रेलियाच्या 480 धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी आज भारताने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 289 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिलने 128 धावांची शतकी खेळी केली तर विराट कोहली 59 धावा करून नाबाद राहिला.

दरम्यान, ज्यावेळी चेतेश्वर पुजारा 42 धावा करून बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रिजवर आला होता. विराट कोहली सेट होत असतानाच त्याच्या विरूद्ध एक जोरदार अपील झाली होती. यावेळी DRS घेण्यावरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने खूप नौटंकीबाजपणा केला होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Steve Smith VIDEO
IND vs AUS 4th Test : शुभमन गिलचे झाले, कोहली आहे मार्गावर.. तिसऱ्या दिवशी भारत पोहचला 300 च्या जवळ

सामन्याच्या 64 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर बीट झाला. त्याच्याविरूद्ध कांगारूंनी झेलबादची जोरदार अपील केली. मात्र ही अपील पंचांनी फेटाळून लावली. स्लीपमध्ये उभा असलेल्या कर्णधार स्टीव्ह स्मिथला DRS घ्याचा होता. यासाठी तो विकेटकिपर एलेक्स कॅरी आणि गोलंदाज टॉड मर्फीला एकत्र घेऊन चर्चा करत होता.

मर्फीने DRS घेण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. त्यानंतर स्मिथ कॅरीकडे आशेने पाहू लागला. DRS घेण्याचा वेळ देखील संपत चालला होता. कॅरीने देखील स्मिथला नकार दिला. या नकारानंतर स्मिथने जी काही प्रतिक्रिया दिली ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मिथ DRS घेण्यासाठी फार उत्सुक होता. मात्र मर्फी आणि कॅरीने त्याची निराशा केली. त्यामुळे स्मिथ निराश झाला. त्याला आपली निराशा देखील लपवता आली नाही. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही DRS घेण्यात जास्त उत्सुकता दाखवली नाही.

Steve Smith VIDEO
Cheteshwar Pujara : अर्धशतक हुकले मात्र पुजाराने विराटला जमलं नाही ते करून दाखवलंय!

यानंतर विराट कोहलीच्या बॅटला चेंडू चाटून गेला होता की नाही यासाठी रिप्ले पाहण्यात आला. त्यावेळी या रिप्लेमध्ये चेंडू विराटच्या बॅटला लागला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जर स्टीव्ह स्मिथने तो DRS घेतला असता तर तो नक्कीच वाया गेला असता. मात्र मर्फी आणि कॅरीने आपल्या संघाचा DRS वाचवला असेच म्हणावे लागेल. स्मिथने मैदानावर विराट कोहली सारखा उत्साह दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याच संघसहकाऱ्यांनी त्याला थंडा प्रतिसाद देत त्याच्या उत्साहातून हवाच काढून घेतली.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.