T20 World Cup : आधी बाप गमावला, नंतर भावाला हिरावून घेतलं; झोपडीत राहणारी क्रिकेटर यंदा उंचावणार 'वर्ल्ड कप'

अंडर 19 महिला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे.
U-19 Womens T20 World Cup Archana Devi
U-19 Womens T20 World Cup Archana Deviesakal
Updated on
Summary

क्रिकेटर अर्चनाचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे. अगदी लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर तिच्या धाकट्या भावाचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशानं मृत्यू झाला. याच वर्षी अर्चना पहिल्यांदा मैदानात उतरली होती.

U-19 Women's T20 World Cup : यूपीच्या उन्नावमधील रहिवासी असलेल्या सावित्री देवी आज बाजारातून 'इन्व्हर्टर' खरेदी करणार आहेत. कारण, सावित्री देवींना आपल्या मुलीचा विश्वचषकातील खेळ पहायचा आहे.

अंडर 19 महिला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5.15 वाजता पॉचेफस्ट्रुम येथील सेनवेस पार्क इथं खेळवला जाणार आहे.

स्पर्धेला जाण्यापूर्वी भारतीय अष्टपैलू अर्चना देवीनं (Archana Devi) आपल्या आईला एक स्मार्ट फोन भेट दिलाय. मात्र, तिच्या गावी लाईटची मोठी समस्या आहे. त्यामुळं लाईट गेल्यावर क्रिकेट सामना पाहता येणार नाही म्हणून अर्चनाची आई बाजारातून आज इन्व्हर्टर खरेदी करणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध 1-1 बळी घेणाऱ्या अर्चनानं 2007 साली वडिलांना गमावलं आहे.

ICC नं प्रथमच महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण आफ्रिकेत होत असलेली ही स्पर्धा जिंकून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना इतिहास रचायचा आहे. अर्चनाच्या रताई पूर्वा गावात 400 लोक राहतात. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अर्चनाची आई सावित्री देवी सांगतात, 'आमच्या गावी विजेची समस्या आहे, त्यामुळं मी इन्व्हर्टर घेण्यासाठी पैसे वाचवले आहेत. माझी मुलगी देशासाठी वर्ल्ड कपची फायनल खेळत आहे. याचा मला खूप अभिमान आहे.'

U-19 Womens T20 World Cup Archana Devi
Assam CM : महिलांनी 30 वयापूर्वीच लग्न करावं आणि मुलं जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

साप चावल्यामुळं भावाचा मृत्यू

क्रिकेटर अर्चनाचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे. अगदी लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर तिच्या धाकट्या भावाचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशानं मृत्यू झाला. याच वर्षी अर्चना पहिल्यांदा मैदानात उतरली होती. पुरुष संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचे प्रशिक्षक पूनम गुप्ता आणि कपिल पांडे यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

U-19 Womens T20 World Cup Archana Devi
Suvendu Adhikari : 'त्यांनी हिंदूंना मारलं, मंदिरं उद्ध्वस्त केली आता मुघलांची नावं-चिन्हं उखडून फेकून द्या'

'गायींचं दूध विकून मुलगीला वाढवली'

अर्चनाची आई सावित्री देवी तिच्या कठीण प्रसंगाबद्दल सांगते, 'मी माझ्या 1 एकर शेतात काम केलं आणि उदरनिर्वाहासाठी माझ्या दोन गायींचं दूध विकलं. मी अर्चनाला घरापासून दूर गंज मुरादाबाद येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात राहायला पाठवलं होतं, म्हणून लोक मला टोमणे मारायचे. विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी मुलीनं भेट दिलेल्या फोनवर मला अंतिम सामना पहायचा आहे, असं त्या सांगतात.

U-19 Womens T20 World Cup Archana Devi
PHOTO : विजयी विश्व तिरंगा प्यारा! ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला 'तिरंगा'

या विश्वचषकात भारतानं 6 पैकी 5 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीये. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव झाला, तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंग्लंड इथं आलं आहे. भारताची कर्णधार आणि सलामीवीर शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांच्यावर संघाची मदार असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.