Stuart Broad Retirement : इंग्लंडचा अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. ब्रॉड हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या अॅशेस कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे.
त्याने याची घोषणा आजच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी केली. पाचव्या कसोटीपूर्वी जेमी अँडरसन निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. त्याने स्पष्टपणे नकार दिला. मात्र स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला.
युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला टी 20 वर्ल्डकपमध्ये सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. त्यामुळे तो भारतात चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र त्याची फक्त एवढीच ओळख नाहीये. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 845 विकेट्स घेतल्या आहेत. (Ashes Test Series 2023 5th Test Day 3 Update)
त्याने 167 कसोटीत 602, 121 वनडे सामन्यात 178 तर 56 टी 20 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या आहे. तर कसोटीत 3656 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 कसोटी शतक आणि 13 अर्धशतके देखील आहेत.
स्टुअर्ट ब्रॉड आपली 17 वर्षाची दीर्घ कारकीर्द संपवताना म्हणाला की, 'उद्या किंवा सोमवारी माझा हा क्रिकेटचा शेवटचा सामना असेल. हा खूप चांगला प्रवास होता. नॉटिंगहमशायर आणि इंग्लंडची कॅप घालणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता.'
ब्रॉड पुढे म्हणाला की, 'मी कायम सर्वोच्च कामगिरी करत असताना निवृत्त होण्याचा विचार करत होतो. या मालिकेत मला असं जाणवलं की या मालिकेत मी सर्वात जास्त क्रिकेटचा आनंद घेतला.'
'मला कायम ऑस्ट्रेलियाविरूद्धचे द्वंद्व आवडायचं. मला अॅशेस खेळायला देखील खूप आवडायचं त्यामुळेच मला माझी फलंदाज आणि गोलंदाज म्हणून शेवटची खेळी ही अॅशेसमध्ये खेळण्याची इच्छा होती.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.