काश्मीरची पोरं क्रिकेट पाठोपाठ फुटबॉलचं मैदान देखील गाजवणार

जम्मू काश्मीरचा सुहेल अहमद ठरला आय लीगमध्ये खेळणारा सर्वात तरूण खेळाडू
Suhail Ahmad became a Youngest Football player of Jammu Kashmir who debut I-League
Suhail Ahmad became a Youngest Football player of Jammu Kashmir who debut I-League esakal
Updated on

जम्मू : जम्मू काश्मीरच्या क्रीडा विश्वाने अजून एक मोठा पल्ला गाठला आहे. क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवल्यानंतर आता काश्मिरी पोरं फुटबॉलमध्येही (Football) आपला दम दाखवत आहेत. जम्मू काश्मीरचा अवघ्या 16 वर्षाचा फुटबॉलपटू सुहेल अहमद (Suhail Ahmad) हा जम्मू काश्मीरचा आय लीगमध्ये (I-League Football) पदार्पण करणारा सर्वात तरूण फुटबॉलपटू ठरला आहे. तो इंडियन अॅरोज फुटबॉल संघाकडून आय लीगमध्ये पदार्पण करणार आहे.

Suhail Ahmad became a Youngest Football player of Jammu Kashmir who debut I-League
मृत्यूपूर्वी शेन वॉर्नने खाल्ले होते Vegemite; मित्राचा खुलासा

जेकेएससी फुटबॉल अकादमीच्या (J&K Sports Council Football Academy) अधिकृत प्रवकत्याने सांगितले की, 'सुहेल हा भारताच्या 17 वर्षाखालील फुटबॉल संघाकडून खेळतो. जेव्हापासून जम्मू काश्मीर स्पोर्ट्स काऊन्सिल फुटबॉल अकादमीची स्थापना झाली आहे तेव्हापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करत आहेत. अनेक खेळाडूंनी मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे.'

'रेशी राजपूत, सजाद हुसैन, मुहीत शबीर आणि सुहेल अहमद या खेळाडूंनी भारतीय संघाकडून आणि आयएसएल क्लबकडून चांगली कामगिरी केली आहे. जेकेएससी फुटबॉल अकादमीचे (JKSC Football Academy) प्रत्येक वर्षी जवळपास 60 खेळाडू हे आय लीगमधील बड्या बड्या क्लबकडून खेळत असतात.'

Suhail Ahmad became a Youngest Football player of Jammu Kashmir who debut I-League
रोहितची कॅप्टन्सी 'एकदम कडक' तरी गावसकरांनी अर्धा मार्क का कापला?

जेकेएससी फुटबॉल अकादमीचे प्रवक्त्यांनी सांगितले की, स्टायकर सुहेल अहमद हा इंडियन अॅरो आणि सुदेवा एफसी या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये खेळण्यास आला. त्याने पदार्पणात क्लबला विजयात मदत केली. दरम्यान, उपराज्यपालांचे सल्लागार फारूक खान यांनी सुहेल खानचे अभिनंदन करत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सरकार खेळाडूंना सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन दिले. याचबरोबर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे प्रिंसिपल सेक्रेटरी अलोक कुमार आणि स्पोर्ट्स काऊन्सिल सेक्रेटरी नुझहात गुल यांनी देखील सुहेलचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.