Paris Paralympic 2024 Badminton: भारताच्या बॅडमिंटनपटूंनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सोमवारचा दिवस गाजवला. नितेश कुमारने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर रात्री थुलासिमाथी मुरूगेसन व मनीषा रामदास यांनी महिला एकेरीच्या SU5 गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.
थुलासिमाथी मुरूगेसनला सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या यांग क्वियू झिआकडून २१-१७, २१-१० असा पराभव पत्करावाव लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हे पॅरालिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला खेळाडूने भारतासाठी जिंकलेले पहिले पदक ठरले. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत मनीषाने डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेन्ग्रेनचा २१-१२, २१-८ असा पराभव केला.
नितेश कुमारचा सुवर्णपदकासाठी अंतिम सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध झाला. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात नितेशने १ तास २० मिनिटाच्या लढतीनंतर २१-१४, १८-२१, २३-२१ अशा फरकाने विजय मिळवला.
भारताच्या सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांच्यात पुरुष एकेरीत SL4 प्रकारात उपांत्य सामना झाला होता. या सामन्यात अव्वल मानांकित सुहास यथिराजने २१-१७, २१-१२ अशा फराकाने सुकांतचा पराभव केला होता. सुवर्णपदकाच्या लढतीत सुहाससमोर फ्रान्सच्या लुकास माझूर याचे आव्हान होते. लुकासने पहिला गेम २१-९ असा जिंकला. दुसरा गेमही फ्रान्सच्या खेळाडूने २१-१३ असा जिंकल्याने भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इ