पॅरालिम्पिक विक्रमासह Sumit Antil ने सुवर्णपदक राखलं! डबल गोल्ड मिळवून घडवला इतिहास

Sumit Antil won Gold Medal: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत सुमीत अंतिलने पुरुषांच्या F64 फालाफेक प्रकारात सुवर्मपदक जिंकत इतिहास रचला आहे.
Sumit Antil
Sumit AntilSakal
Updated on

India at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी भारताला तिसरं सुवर्णपदक सुमीत अंतिलने जिंकून दिलं. त्याने पुरुषांच्या F64 फालाफेक स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

याआधी नीरज चोप्राला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता आली नाहीत याची खंत भारतीयांमध्ये होती. पण सुमीतने सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकून आनंद साजरा करण्याची संधी दिली

सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत सुमीतने सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच पॅरालिम्पिकमध्ये नवा विक्रमही केला. त्याने ७०.५९ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. त्याने यावेळी त्याचाच विक्रम मोडला आहे. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ६८.५५ मीटर लांब भाला फेकत विक्रम केला होता. आता हाच विक्रम त्याने मागे टाकला आहे.

Sumit Antil
Paralympic 2024: नितेशने पॅरिसमध्ये फडकवला तिरंगा! IIT पदवीधर आता सुवर्णपदक विजेता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.