Sumit Nagal: भारतीय टेनिस संघाला डेव्हिस कपमधील महत्त्वाच्या लढतींपूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताच्या सर्वोच्च मानांकित टेनिसपटू सुमित नागलने डेव्हिस कप स्पर्धेतील स्वीडनविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे.
त्याने पाठीच्या दुखापतीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे. सुमितच्या या निर्णयाबद्दल त्याने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत सस्पष्टीकरण दिले आहे.
सुमितने सांगितले की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माघार या स्पर्धेतून घेतली आहे. नुकतेच यूएस ओपन २०२४ च्या पहिल्याच फेरीत सुमितला पराभव पत्कारावा लागला होता.
हे सामने गमावल्यानंतर निराश झालेल्या सुमितला पुनरागमन करायचे होते. परंतु पाठीच्या समस्येमुळे सुमितची ही इच्छा अपूर्ण रहाणार आहे.
सोशल मीडिया वर पोस्ट करत सुमित म्हणाला, "सर्वांना नमस्कार, मी स्वीडनविरुद्धच्या आगामी डेव्हिस कप लढतीत प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक होतो. परंतु मागील काही आठवड्यांपासून मला सतावत असलेल्या पाठीच्या समस्येमुळे, डॉक्टरांनी मला पुढील दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. स्वीडनमधील स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने मला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागत आहे. याच समस्येमुळे मी यूएस ओपन दुहेरी गटातूनही माघार घेतली होती."
तो पुढे म्हणाला की, "हा सामना न खेळता आल्यामुळे मी खूप निराश झालो आहे, पण पाठीचा त्रास आणखी वाढू नये म्हणून मला माझ्या शरीराचे ऐकावे लागेल, जेणेकरून मी हा हंगामात निरोगी राहून खेळू शकेन. स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघाला माझ्याकडून शुभेच्छा."
सुमित भारताचा एकेरीतील सर्वोच्च क्रमांकाचा खेळाडू असल्याने तो डेव्हिस कपसाठी नसणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो. सुमितने या वर्षी जुलैमध्ये टेनिस क्रमवारीत ६८ क्रमांक गाठत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी केली होती, परंतु ताज्या क्रमवारीत तो ८२ क्रमांकावर घसरला आहे.
रामकुमार रामनाथन, एन श्रीराम बालाजी, निकी पूनाचा, सिद्धार्थ विश्वकर्मा, आर्यन शाह (राखीव खेळाडू).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.