Sunil Gavaskar : पाकिस्तान काय भारतही लिस्टमध्ये नाही... गावसकरांच्या मते कोण आहे वर्ल्डकपचा संभाव्य विजेता?

Sunil Gavaskar
Sunil Gavaskar ESAKAL
Updated on

Sunil Gavaskar World Cup 2023 Favorites : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधून होणार आहे. पहिला सामना हा गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान, भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे संभाव्य विजेते कोण असतील याबाबत माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समिक्षक आपली मते व्यक्त करत आहेत.

भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी देखील त्यांच्या मते यंदाच्या वर्ल्डकपचा संभाव्य विजेता कोण असणार हे सांगितले विशेष म्हणजे त्यांनी ना भारताला ना पाकिस्तानला यंदाच्या वर्ल्डकपचा संभाव्य विजेता म्हणून निवडलं नाही. गावसकरांनी आपलं वजन हे गतविजेत्या इंग्लंडच्या पारड्यात टाकलं.

Sunil Gavaskar
Anushka-Virat Kohli: एकीकडे वर्ल्डकपचा उत्साह दुसरीकडे बाबा होण्याचा आनंद! अनुष्का - विराटच्या घरी गुडन्यूज?

गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'माझ्या मते इंग्लंडला चांगली संधी आहे. कारण त्यांच्या संघात वरच्या फळीत ज्या प्रकारचे गुणवान खेळाडू आहेत, त्याच्याकडे ज्या प्रकारची बॅटिंग ऑर्डर आहे, अव्वल दर्जाचे दोन ते तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. ते फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगले आव्हान निर्माण करू शकतात. त्यांच्याकडे उत्तम दर्जाची गोलंदाजी देखील आहे. त्यामुळे सध्या ते माझ्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.'

गावसकरांनी जरी इंग्लंडच्या पारड्यात आपले वजन टाकले असले तरी इरफान पाठणने मात्र भारतीय संघ यंदाचा वर्ल्डकप जिंकेल असे सांगितले. कारण यजमानांनी वर्ल्डकपपूर्वी संघात चांगला समतोल साधला आहे.

Sunil Gavaskar
ICC World Cup 2023 : भारत कमवणार तब्बल 13 हजार कोटी रूपये; इतरांच्या तुलनेत तीन पट जास्त होणार कमाई?

पठाण म्हणाला की, 'भारत कशी कामगिरी करतोय हे पाहणे माझ्यादृष्टीने महत्वाचे आहे. मला वाटतं की खरोखर ते यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फेव्हरेट आहेत. कारण गेल्या मालिकांमध्ये, आशिया कपमध्ये ते ज्या प्रकारे खेळले आहेत. मला वाटते की त्यांनी सर्व पातळीवर चांगली तयारी केली आहे.'

तो पुढे म्हणाला की, 'भारतीय संघात चांगली कामगिरी केलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र मोहम्मद शमी सारखा खेळाडू जो प्लेईंग 11 मध्ये सातत्याने खेळत नाहीये. शमी हा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. यावरून भारतीय संघ किती मजबूत आहे. त्याची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे हे दिसून येते.'

भारतीय संघ आज गुवाहाटीत इंग्लंडविरूद्ध आपला पहिला सराव सामना खेळणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.