IPL वाद! सुनिल गावसकरांनी ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टला फटकारले

Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remark
Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remarkesakal
Updated on

Sunil Gavaskar : आयपीएलला आयसीसीच्या 2024 च्या फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये अडीच महिन्यांची विंडो मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये टी 20 फ्रेंचायजी क्रिकेटचा वाढता प्रभाव अधोरेखित होत आहे. याचबरोबर आयपीएलमधील (IPL Franchise) फ्रेंचायजींनी जगभरातील इतर टी 20 लीगमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यात युएई आणि साऊथ आफ्रिका टी 20 लीग यांचा देखील समावेश आहे. (Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remark)

Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remark
Laal Singh Chaddha : चित्रपट पाहिल्यावर विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना म्हणाले...

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) बिग बॅश लीग न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आले. तो बिग बॅशच्या (Big Bash League) ऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी 20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तेथे त्याला बक्कळ पैसा मिळण्याची आशा आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) टीका केली. गिलख्रिस्ट जागतिक पातळीवर आयपीएल कसे वर्चस्व गाजवत याबाबत देखील आपले मत व्यक्त केले.

गिलख्रिस्ट एका रेडिओ शो मध्ये बोलताना म्हणाला, 'ते डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यासाठी सक्ती करू शकत नाही. मला याची जाणीव आहे मात्र त्याला जाऊ देणे किंवा दुसऱ्या खेळाडूला जाऊ देणे हा सर्व आयपीएल फ्रेंचायजींच्या जागतिक पातळीवरच्या वर्चस्वाचा भाग आहे. यात वॉर्नरला एकट्याल दोष देण्यात येऊ नये कारण अजून अनेक खेळाडू त्यांच्या रडारवर असणार आहेत. आयपीएल फ्रेंचायजींनी कॅरेबियन प्रीमियर लीगमधील संघ विकत घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे.

Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remark
Aakash Chopra : आकाशवरच युजर्सनी टाकला बहिष्कार; लाल सिंग चड्ढाबद्दल म्हणाला...

गिलख्रिस्टच्या या वक्तव्यावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी स्पोर्ट्सस्टारमध्ये लिहिलेल्या आपल्या स्तंभात 'आयपीएलमुळे परत एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कॅलेंडर प्रभावित झाले आहे हे वाचून हसू आले. ज्यावेळी दक्षिण आफ्रिका टी 20 लीग आणि युएई टी 20 लीगची बातमी बाहेर आली. क्रिकेटमधील जुन्या शक्तींनी चुळबुळ सुरू केली आहे. त्यांनी आयपीएलबद्दल व्यक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'आयपीएलला आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये 75 दिवसांची विंडो मिळाली आहे. क्रिकेट प्रशासकांनी भविष्याचा वेध घेतला यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांना कळून चुकले की खेळाडूंना काही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास भाग पाडण्यापेक्षा जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळू द्यावे.'

Sunil Gavaskar Criticize Adam Gilchrist And Australia IPL Remark
Will Smeed : विल स्मीडने 'द हंड्रेड' स्पर्धेत ठोकले पहिले शतक; रचला इतिहास

सुनिल गावसकर यांनी क्रिकेटमधील जुन्या महाशक्तींनाही चिमटा काढला. ते म्हणाले, 'इतर क्रिकेट बोर्डांना अखेर उमगले आहे की एमसीसी प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये आमंत्रित करून क्रिकेटचा विस्तार होणार नाही. नव्या प्रशासकांना कोणताही कमीपणाचा न्यूनगंड नाही. त्यांनी प्रत्येक चार वर्षाच्या अंतराने भारतात येऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली आहे. आता त्या जुन्या महाशक्तींना भारताने त्यांच्या देशात प्रत्येक वर्षी खेळण्यास यावे असे वाटते. कारण ज्यावेळी भारतीय संघ त्यांच्याविरूद्ध खेळतो त्यावेळी त्यांच्या झोळीत अधिक पैसे येतात. या सर्वाचा अर्थ तुम्ही तुमचा क्रिकेटमधील स्वार्थ पाहा मात्र कृपा करून आमच्या घरात डोकावून आम्हाला काय करायचं हे शिकवू नका. आम्हाला आमचे हित समजते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.