रोहितची कॅप्टन्सी 'एकदम कडक' तरी गावसकरांनी अर्धा मार्क का कापला?

रोहित शर्माने जडेजाच्या बाबतीत केलेली कॅप्टन्सीमधील एक बारीक चूक गावसकरांनी दाखवून दिली
Sunil Gavaskar rate Rohit Sharma Test Captaincy
Sunil Gavaskar rate Rohit Sharma Test Captaincy esakal
Updated on

रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या कसोटी नेतृत्वाचीही (Test Captaincy) धडाक्यात सुरूवात केली. श्रीलंकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयावर माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माची पाठ थोपटली. त्यांनी रोहितच्या कडक कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. मात्र त्यांनी रोहितला पैकीच्या पैकी मार्क दिले नाहीत. त्यांनी रोहितच्या कॅप्टन्सीला 10 पैकी 9.5 मार्क दिले.

Sunil Gavaskar rate Rohit Sharma Test Captaincy
Video शेअर करत विराट म्हणाला, तुम्ही माझा प्रवास सुंदर केलात!

स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना सुनिल गावसकर यांनी रोहितच्या फिल्डिंग प्लेसमेंट (Field Placement), गोलंदाजीतील बदल (Bowling Changes) हे योग्य होते. गावसकर म्हणाले, 'तुम्ही त्याने संघाचे नेतृत्व कशा प्रकारे केले हे पाहा. माझ्या मते त्याचे गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणातील बदल एकदम योग्य होते. एखादा भावना नसलेला व्यक्तीच त्याला 10 पैकी 9.5 मार्क देऊ शकतो. तो अर्धा मार्क कायम आपल्या जवळ ठेवतो. त्यामुळे रोहितला 10 पैकी 9.5 मार्क मिळतील.'

Sunil Gavaskar rate Rohit Sharma Test Captaincy
जडेजा द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना डाव का घोषित केला? रोहित म्हणाला..

सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वातील एक बारीक चूक (Rohit Captaincy Minor Error) लक्षात आणून दिली. सुनिल गावसकर म्हणाले, 'कसोटी कर्णधार म्हणून रोहितचे जबदस्त पदार्पण झाले आहे. त्याने सामा तीन दिवसात जिंकला. यामुळे तुमचा संघ किती तगडा आहे हे दिसून येते. पण, सर्वात महत्वाचे ज्यावेळी तुमचा संघ फिल्डिंग करत असतो त्यावेळी गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररक्षणाची सजावट महत्वाची असते. रोहितने या गोष्टीत प्रभावित केले. झेल हे रोहितने उभे केलेल्या खेळाडूच्या हातात गेले. त्यांना फारसे हलण्याची गरजच लागली नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची सजावत जबरदस्त होती.'

Sunil Gavaskar rate Rohit Sharma Test Captaincy
ICC Women's WC: मितालीचा 'रेकॉर्ड राज'; सचिनच्या रेकॉर्डची केली बरोबरी

गावसकर पुढे म्हणाले की, 'गोलंदाजीतही तुम्ही पहिल्या डावात रविंद्र जडेजाला लवकर गोलंदाजीला आणायला पाहिजे होते असे म्हणू शकता. मात्र आता त्याने काही फरक पडणार नाही. कारण आपण सामना दोन दिवस शिल्लक राखून जिंकला आहे. या छोट्या गोष्टी लोक बोलतील.' भारताचा श्रीलंकेबरोबरचा दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरूमध्ये होणार असून हा सामना दिवस रात्र सामना असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.