Sunil Gavaskar : सूर्यकुमारनं असं काहीही मोठं केलेलं नाही... सुनिल गावसकर यांनी कोणाच्या पारड्यात टाकलं आपलं वजन

Sunil Gavaskar
Sunil Gavaskaresakal
Updated on

Sunil Gavaskar : भारतीय संघाने नुकतेच आपली वर्ल्डकपसाठीची टीम फायनल केली. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनची शेवटच्या क्षणी संघात वर्णी लागली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या मधल्या फळीने चांगल्या धावा करत रोहित शर्माची चिंता मिटवली. मात्र चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा नवा प्रश्न देखील उपस्थितीत केला.

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी चुरस आहे. दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत दमदार खेळी केली. मात्र भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी मात्र सूर्यकुमारऐवजी श्रेयस अय्यरला संघात प्राथमिकता मिळावी असे मत व्यक्त केले.

Sunil Gavaskar
Asian Games : पलक आणि इशाने उंचावली देशाची मान; एअर पिस्टल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड अन् सिल्व्हर मेडल

सुनिल गावसकर म्हणाले की, 'सूर्यकुमारने वनडे क्रिकेटमध्ये अजून मोठी कामगिरी केलेली नाही. तो शेवटच्या 15 ते 20 षटकात फलंदाजी करतोय आणि त्याचे टी 20 क्रिकेटमधील कौशल्य वापरत धावा करतोय. नक्कीच हे महत्वाचं आहे. मात्र हार्दिक पांड्या, इशान किशन, केएल राहुल हे देखील ही भुमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात.'

'त्यामुळे अय्यर हा चौथ्या क्रमांकावर एकमद फिट आहे. सूर्यकुमार यादवला अजून वाट पहावी लागले. जर सूर्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली तर त्याला मोठे शंभर करावे लागतील आणि मी देखील मोठ्या खेळी करू शकतो हे दाखवावे लागेल.'

Sunil Gavaskar
Asian Games : सोन्याची लयलूट सुरूच! 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडल; मेन्स टीमची सुवर्ण कामगिरी

भारताने अक्षर पटेलच्या ऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात जागा मिळाली आहे. अक्षर पटेलच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे तो लवकर फिट होण्याची शक्यता नाही. त्यानंतर अश्विनला संघात स्थान देण्यात आले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन वनडे सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.