Sunil Gavaskar : पंत की कार्तिक; गावसकर म्हणतात, धोका पत्करल्याशिवाय...

Sunil Gavaskar Statement Over Rishabh Pant And Dinesh Karthik Who Is First Choice
Sunil Gavaskar Statement Over Rishabh Pant And Dinesh Karthik Who Is First Choiceesakal
Updated on

Sunil Gavaskar T20 World Cup India squad : भारताचा टी 20 वर्ल्डकप 2022 साठीचा संघ जाहीर झाल्यापासून सर्वत्र एकच चर्चा आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला खेळवायचं की दिनेश कार्तिकला. या दोघांचीही संघात निवड ही विकेटकिपर बॅट्समन म्हणून झाली आहे. त्यामुळे भारताची विकेटकिपर म्हणून पहिली पसंती कोण याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी पंत की कार्तिक या प्रश्नाचं बेधडक उत्तर दिलं. (Rishabh Pant And Dinesh Karthik Who Is First Choice)

Sunil Gavaskar Statement Over Rishabh Pant And Dinesh Karthik Who Is First Choice
India Vs Pakistan : भारत - पाक सामन्यानंतर अजूनही इंग्लंडमध्ये तणावपूर्ण वातावरण

गावसकर एका माध्यम समुहाशी बोलताना म्हणाले की, 'मी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांनाही प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवेन. पंत 5 वर हार्दिक पांड्या 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करतील किंवा उलटही होऊ शकते. दिनेश कार्तिक 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. मी हार्दिक पांड्या आणि चार गोलंदाज घेऊन मैदानात उतरेन. जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुम्ही जिंकणार कसं? तुम्हाला सर्व विभागात धोका पत्करावा लागले त्यानंतरच त्याचं फळ मिळू शकेल.'

Sunil Gavaskar Statement Over Rishabh Pant And Dinesh Karthik Who Is First Choice
Yuvraj Singh : बापानं मुलाला दिलं '6 सिक्सेस'चं बाळकडू; VIDEO होतोय व्हायरल

या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने वक्तव्य केले होते की, 'आमच्या संघात पहिल्या पसंतीचा विकेटकिपर असं काही नाही. आम्ही परिस्थिती, प्रतिस्पर्धी यानुसार आमचा सर्वोत्त 11 खेळाडूंचा संघ निवडतो. आमच्या संघात पहिली पसंती अशा प्रकारच्या गोष्टी नाहीत. परिस्थितीनुसार यात बदल होत असतात. पाकिस्तानविरूद्ध त्या दिवशी आम्हाला वाटले की दिनेश कार्तिक ही योग्य निवड आहे असं आम्हाला वाटलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.