Kaviya Maran: काव्या मारन होणार दक्षिण आफ्रिकेची सून? SA20 लीगमधील तो VIDEO व्हायरल

काव्या नेहमी आपल्या सौंदर्यांने सर्वांचे लक्ष वेधून् घेत असते.
Sunrisers Hyderabad Kaviya Maran gets marriage proposal from a South African fan  SA20 match
Sunrisers Hyderabad Kaviya Maran gets marriage proposal from a South African fan SA20 match esakal
Updated on

आयपीएलच्या लिलावात अंबानींना टक्कर देणारी काव्या मारन नेहमी चर्चेत असते. काव्या नेहमी आपल्या सौंदर्यांने सर्वांचे लक्ष वेधून् घेत असते. दरवर्षी लिलाव असला की काव्याची चर्चा होताना दिसते. मात्र, ती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ( Kaviya Maran gets marriage proposal from a South African fan SA20 match )

काव्याची सौंदर्यता पाहून तिला नॅशनल क्रश असंही संबोधलं जातं. काव्याची ही जादू केवळ आयपीएलमध्येच नाही तर आता साऊथ अफ्रिकेतही पाहायला मिळत आहे.

Sunil Gavaskar : फॅशन शोमध्ये जा! गावसकरांच्या सर्फराजला डावलणाऱ्या निवडसमितीला कानपिचक्या

आयपीएल फ्रँचायझीची मालकीण असलेल्या काव्या मारननेही साऊथ आफ्रिकेत सुरू झालेल्या नव्या टी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. या लीगमध्ये एकूण 6 आयपीएल फ्रँचायझींनी संघ खरेदी केले आहेत, त्यापैकी एक सनरायझर्स आहे.

SA20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न कॅप सामना 19 जानेवारीच्या संध्याकाळी पार्ल रॉयल्ससोबत होता, जो पाहण्यासाठी काव्या तिथे पोहोचली होती.

अफ्रिकेच्या चाहत्याला काव्याची भुरळ

पार्ल रॉयल्सविरुद्धचा सनरायझर्स इस्टर्न कॅप सामना पाहण्यासाठी काव्या मारनही स्टेडियममध्ये पोहोचली. या सामन्यात पार्ल रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. आणि, त्यांच्या डावाचे 8 वे षटक पूर्ण होत असतानाच एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या चाहत्याचे हातातील फलक कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

Sikander Sheikh : सिकंदरची जबरदस्त कामगिरी! अनुभवी मल्लांना लोळवून ठरला 'विसापूर केसरी'

साऊथ अफ्रिकेचा एक चाहता सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या हाती फलक दिसले. ज्याच्यावर चाहत्याने काव्याला लग्नाची मागणी घातली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कोण आहे काव्या मारन?

काव्या हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. देशातील सर्वात मोठ्या टीव्ही नेटवर्कमध्ये सन टीव्ही नेटवर्क (ज्यांच्याकडे ३२ टीव्ही आणि ४२ एफएम रेडिओ स्टेशन आहेत) चा समावेश होतो.

काव्या क्रिकेट सोबत एफएम रेडिओमध्ये देखील सक्रीय असते. गेल्या वर्षी काव्याला सन टीव्ही नेटवर्कच्या संचालक मंडळात घेण्यात आले होते. काव्याने चेन्नईमधील स्टेलिया मारिस कॉलेजमधून बी कॉमची पदवी घेतली.

तिने सन टीव्ही नेटवर्कमधून इंटर्नशिप केली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमधील लियोनार्ड अण्ड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA पूर्ण केले. काव्याने २०१७ नंतर सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटला वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

काव्या सन नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे. फार कमी वयात काव्याने ही मोठी मजल मारलेली आहे. आयपीएलच्या लिलावात यापूर्वी चर्चा व्हायची ती अंबानींची. पण गेल्या काही वर्षांपासून काव्याची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.