माझी सपोर्ट सिस्टम ढासळली; वडिलांच्या आठवणीत रैना भावूक

Suresh Raina
Suresh RainaSakal
Updated on

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे रविवारी निधन झाले. वडिलांच्या जाण्यानं माझ्या आयुष्यातील सपोर्ट सिस्टीम ढासळली आहे. ते माझ्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आणि आधारस्तंभ होते. ते लढवय्या होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला झुंज दिली, अशी भावना सुरेश रैनाने व्यक्त केली आहे. वडिलांना गमावण्याचे दु:ख शब्दात सांगता येणार नाही, असा उल्लेखही त्याने आपल्या सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. (Former India cricketer Suresh Raina Emotional Post After Fatherlosing battle with cancer)

सुरेश रैना याचे (Suresh Raina) वडील त्रिलोकचंद रैना (Trilokchand Raina) लष्करात सेवा निवृत्त अधिकारी होते. गाझियाबाद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जम्मू काश्मीरमधील रैनावारी हे त्यांचे मूळ गाव. 1990 मध्ये काश्मीरी पंडितांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना गाव सोडावे लागले. ते मुराबादनगरमध्ये स्थलातंर झाले आणि पुढे ते इथेच स्थायिक झाले.

Suresh Raina
पहिल्या वनडेत विराटचा फ्लॉप शो तरी '5 हजारी मनसबदारी'
Suresh Raina
मोदी आवडते नेते, मितालीचं उत्तर; 'भाववाढ पाहिलीस का?' चाहत्याचं प्रतिउत्तर

रैनाचे वडील सैन्यात अधिकारी असले तरी त्याकाळात त्यांना मिळणारे वेतन खूपच कमी होते. यातूनही त्यांनी मुलाला क्रिकेट बनवण्याचे स्वप्न पाहिले. यासाठी सुरुवातीला त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. रैनानं कठोर मेहनतीच्या जोरावर रैनाने स्वत:ला सिद्ध करुन वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला.

1998 मध्ये रैनानं लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सुरेश रैनानं 30 जुलै 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून भारीय संघात पदार्पण केले होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतच त्याने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेत असल्याची घोषणा केली होती. आपल्या या कारकिर्दीत त्याने 226 वनडे, 78 टी-20 आणि 18 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. आयपीएलमध्ये तो 205 सामने खेळला असून आगामी हंगामातही तो खेळताना दिसू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.