Video : पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम! माजी CSK थला रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Suresh Raina Returning Ground Ware CSK Jersey Video Gone Viral
Suresh Raina Returning Ground Ware CSK Jersey Video Gone Viral esakal
Updated on

Suresh Raina Chennai Super Kings : भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला गेल्या IPL 2022 लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केले होते. आयपीएलमध्ये ज्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सुरेश रैनाने मिस्टर आयपीएल ही बुरूदावली मिळवली त्यात सीएसकेने त्याला रिलीज केल्याने चाहते नाखूष होते. विशेष म्हणजे रिलीज केलेल्या रैनाला कोणत्याच आयपीएल संघाने जवळ केले नाही. अखेर तो अनसोल्ड राहिला. त्यामुळे रैनाचे फॅन्स जास्तच भडकले होते. (Suresh Raina Returning Ground Ware CSK Jersey Video Gone Viral)

Suresh Raina Returning Ground Ware CSK Jersey Video Gone Viral
India Vs Pakistan : बुडत्याचा पाय खोलात! Asia Cup मध्ये पाकिस्तानला अजून एक धक्का?

चेन्नई सुपर किंग्ज आणि सुरेश रैना यांचे नाते खूप काळापासूनचे आहे. 2008 च्या पहिल्या हंगामापासून सुरेश रैना चेन्नई सोबत होता. याला फक्त 2016 आणि 2017 चा हंगाम अपवाद होता कारण त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, चेन्नईने रिलीज केलेला रैना नुकताच मैदानात परतला.

ज्यावेळी रैना मैदानात परतला त्यावेळी त्याने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातली होती. हे क्रिकेट चाहत्यांच्या आणि सीएसके चाहत्यांच्या लक्षात यायला काही फार वेळ लागला नाही. त्यानंतर सुरेश रैनाचा हा सीएसकेची जर्सी घातलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला.

Suresh Raina Returning Ground Ware CSK Jersey Video Gone Viral
Asia Cup : भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार का घातला होता?

अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यालवर कमेंट करण्यास सुरूवात केली. एक नेटकरी म्हणतो की, 'या व्यक्तीकडे डिलीट करण्यासाठी असंख्य कारणे आहेत. मात्र तरीही त्याने सीएसके किट घालणेच पसंत केले.' सुरेश रैनाने हा व्हिडिओ शेअर करत त्याला 'ज्यावेळी मी मैदानावर असतो त्यावेळेच्या भावनांची तुलनाच होऊ शकत नाही. मैदानावर चांगला वेळ व्यतित झाला.' असे कॅप्शन दिले होते.

सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला महेंद्रसिंह धोनी सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने आयपीएल मेगा लिलावात 1 कोटी बेस प्राईस ठेवली होती. मात्र त्याला कोणी विकत घेतले नाही. त्यानंतर तो आयपीएलच्या समालोचन कक्षात दिसला. आता तो पुन्हा मैदानात तेही सीएसकेची जर्सी घालून उतरल्याने रैना आता पुन्हा क्रिकेटमध्ये परतणार का? तो आयपीएलच्या पुढच्या हंगामाची तयारी तर करत नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.