अहमदाबाद : संपूर्ण एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा एका बाजूला आणि त्यातील भारत-पाक सामना दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हायहोल्टेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाक सामन्यासाठी प्रेक्षक कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. हॉटेलच्या भाड्याने उच्चांक गाठल्यानंतर आता अहमदाबादमधील रुग्णालयांच्या बेडसाठी मागणी वाढू लागली आहे.
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर व्हायचे होते; पण त्या अगोदरच भारत-पाक साखळी सामना १५ ऑक्टोबरला होणार, हे सर्वांना कळले होते तेव्हापासून अहमदाबादमधील हॉटेलसाठी मागणी वाढू लागली होती.
या संधीचा फायदा घेत हॉटेलमालकांनी एका रात्रीचे भाडे ५० हजार इतके वाढवले, तरीही ते हाउसफुल्ल झाले. आता जवळपास सर्व हॉटेलच्या रुम बुक झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवसांसाठी (१४ आणि १५ ऑक्टोबर) निवासाची व्यवस्था कोठे करायची, असा विचार क्रिकेटप्रेमी करू लागले होते. त्यातून रुग्णालयाचा पर्याय सापडला आहे.
एका वृत्तानुसार तीन ते २५ हजार रुपये एका दिवसांसाठी असे रुग्णालयातील बेडचे भाडे असल्याचे समजत आहे. त्यात वैद्यकीय तपासणी आणि जेवण यांचा समावेश आहे. येथील सानिध्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक पारस शहा यांनी ही माहिती दिली.
शरीराची संपूर्ण तपासणी (बॉडी चेक) करायची असेल, तर एक दिवस रुग्णालयात थांबावे लागते. याच नियमाचा आधार भारत-पाक सामन्याचे क्रिकेट दिवाने घेत आहेत. शरीराची तपासणी आणि भारत-पाक सामना असा दुहेरी फायदा होऊ शकेल, असे क्रिकेटप्रेमींना वाटत आहे. क्रिकेटप्रेमींची ही आयडिया रुग्णालयांच्याही लक्षात आली आहे.
त्यामुळे त्यांनीसुद्धा वाढत्या मागणीमुळे पॅकेजची रक्कम वाढवली आहे, असे सानिध्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचेच वरिष्ठ डॉक्टर निखिल लाला यांनी सांगितले. एक ते दोन दिवसांसाठी (१५ ऑक्टोबर धरून) आम्हाला संपूर्ण शरीराची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात रहायचे आहे, अशी विचारणा आम्हाला वारंवार होत आहे.
१५ ऑक्टोबरला भारत-पाक सामना आहे, हे आम्हालाही माहीत आहे. केवळ आमच्या येथेच नव्हे, तर अहमबाद आणि जवळच्या परिसरात, शहरांतील रुग्णालयातही अशीच मागणी केली जात आहे, असे लाला म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.