Surya Kumar Yadav : वनडेतील कामगिरी साधारण... सूर्या स्पष्टच बोलला

एकदिवसीय प्रकारात सुधारणा करण्यासाठी अखेरच्या १५ ते १८ षटकांत किमान ४५ ते ५० चेंडू खेळण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला मला संघ व्यवस्थापनाने दिला आहे
Surya Kumar Yadav
Surya Kumar YadavSakal
Updated on

गयाना - एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझ्याकडून होणाऱ्या धावा एकदमच सर्वसाधारण आहेत आणि हे मान्य करण्यास मला खेद वाटत नाही, अशी कबुली सूर्यकुमार यादवने दिली.

ट्वेन्टी-२० प्रकारात दादा फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमारने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४४ चेंडूंत ८३ धावांची झंझावाती खेळी साकार केली.

त्यामुळे सामन्यात सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार स्वीकारताना सूर्यकुमारने एकदिवसीय क्रिकेटबाबत विचारलेल्या प्रश्नावर मतप्रदर्शन केले.

Surya Kumar Yadav
Mumbai Crime : कुख्यात गुंड नवीन केशवानी याला उत्तर प्रदेशातील बनारस येथून अटक...

एकदिवसीय प्रकारात सुधारणा करण्यासाठी अखेरच्या १५ ते १८ षटकांत किमान ४५ ते ५० चेंडू खेळण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला मला संघ व्यवस्थापनाने दिला आहे; परंतु आपल्याकडून ते होत नाही, अशी कबुली सूर्यकुमारने दिली.

आपल्या कामगिरीबाबत प्रामाणिकपणा दाखवणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे; परंतु यात सुधारणा कशी करायची यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत, असे सूर्यकुमारने सांगितले.

एकदिवसीय प्रकारात मी फार खेळत नाही, त्यामुळे ट्वेन्टी-२० प्रमाणे न खेळता वेगळ्या विचाराने खेळण्याची गरज आहे, असा सल्ला रोहित आणि राहुल सरांनी मला दिला आहे. अखेरच्या १० ते १५ षटकांत ४५ ते ५० चेंडू खेळलो तर मला माझा स्वतःचा खेळ करता येईल आणि हे माझ्या हाती आहे, असे सूर्यकुमार म्हणतो.

तिलकला आयपीएलचा फायदा

केवळ तिसरा सामना खेळत असला तरी कमालीची प्रघल्भता दाखवणाऱ्या तिलक वर्माचे सूर्यकुमारने कौतुक केले. आम्ही एकत्र मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहोत.

त्यामुळे मला त्याची क्षमता माहिती आहे आणि आयपीएलच्या अनुभवाचा फायदा तो या आंतरराष्ट्रीय मालिकेत घेत आहे. त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे तो म्हणाला.

सूर्यकुमार एकदिवसीय क्रिकेटमध्ये

वेस्ट इंडीजमधील तीन एकदिवसीय सामन्यांत सूर्यकुमारला अनुक्रमे १९, २४ आणि ३५ धावाच करता आल्या आहेत. आतापर्यंत तो २६ एकदिवसीय सामन्यांत खेळला असून त्याने २४.३३ च्या सरासरीने ५११ धावा केल्या आहेत. याच वेळी टी-२० प्रकारातील त्याची सरासरी ४५.६ इतकी आहे. गेल्या १० एकदिवसीय सामन्यात तर त्याची सरासरी १४ पर्यंत घसरली आहे. मी ट्वेन्टी-२० प्रकारात अधिक खेळतो.

Surya Kumar Yadav
Mumbai Crime : कुख्यात गुंड नवीन केशवानी याला उत्तर प्रदेशातील बनारस येथून अटक...

त्यामुळे हीच सवय मला झाली आहे. एकदिवसीय प्रकार फार आव्हानात्मक असतो, कारण तुम्हाला परिस्थितीनुसार खेळात बदल करावा लागतो. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले असतील तर खेळपट्टीवर अधिक वेळ घालवावा लागतो, म्हणजेच कसोटी क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करावी लागते आणि अंतिम षटकांत ट्वेन्टी-२० प्रमाणे दृष्टिकोन ठेवावा लागतो, असे सूर्यकुमारने सांगितले.

Surya Kumar Yadav
Mumbai Local Train Update : ऐन कामावर निघण्याच्या वेळेत रेल्वेने ट्रॅक बदलला! प्रवाशांनी रोखून धरली लोकल

संघ व्यवस्थापनाने मला हाच सल्ला दिला आहे. फलंदाजीस गेल्यावर काही वेळ सावध फलंदाजी कर, सामन्याच्या परिस्थितीनुसार बदल कर आणि अंतिम टप्प्यात तुझा पारंपरिक खेळ कर, असे मला सांगण्यात आले आहे आणि मी यापुढे याच धोरणानुसार खेळ करणार असल्याचे सूर्यकुमार म्हणाला.

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ बऱ्यापैकी एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी पुरेशी तयारी करण्याची संधी संघाला मिळार आहे.

अजून ७ ते ८ सामने आहेत. माझ्या मते, एवढे सामने चांगल्या तयारीसाठी पुरेसे ठरू शकतील. त्यानंतर वर्ल्डकपसाठी सराव शिबिर होईल आणि त्यात प्रत्येकाची जमेची आणि कमकुवत बाजू तपासता येईल, असे सूर्यकुमार म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.