Surya Kumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात सुरूवातीला बसलेल्या दोन धक्क्यानतंरही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली.
सूर्यकुमार यादवने या खेळीदरम्यान, आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील आपल्या 2000 धावा देखील पूर्ण केल्या. इनिंग्जच्या बाबतीत सर्वात वेगाने टी 20 मध्ये 2000 धावा पूर्ण करणारा तो संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.
विराट कोहली - 107 डावात 4008 धावा
रोहित शर्मा - 140 डावात 3853 धावा
केएल राहुल - 68 डावात 2256 धावा
सूर्यकुमार यादव - 56 डावात 2000 धावा
बाबर आझम - 52 डाव
मोहम्मद रिझवान - 52 डाव
विराट कोहली - 56 डाव
सूर्यकुमार यादव - 56 डाव
केएल राहुल - 58 डाव
सूर्यकुमार यादवने याचबरोबर अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. तो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 2000 धावा पूर्ण करणार पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने 1164 चेंडूतच टी 20 मध्ये आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.