Surya Kumar Yadav : दक्षिण आफ्रिकेत सूर्याचा मोठा विक्रम; यापूर्वी झालं नाही ते करून दाखवलं

Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav esakal
Updated on

Surya Kumar Yadav : भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संघासाठी करो या मोर स्थितीतल्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 56 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 बाद 201 धावा केल्या.

सूर्यकुमारचे हे टी 20 क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. तर दक्षिण आफ्रिकेत टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Surya Kumar Yadav
Baba Indrajith Vijay hazare trophy: ओठ फाटला तरी बाबा इंद्रजीत लढला! संघाचा पराभव तरी मन जिंकलं

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक ठोकणारे फलंदाज :

  • सूर्यकुमार यादव - 57 डावात 4 शतके

  • ग्लेन मॅक्सवेल - 92 डावात 4 शतके

  • रोहित शर्मा - 140 डावात 4 शतके

सूर्यानं कोणत्या देशात ठोकली टी 20 शतके?

  • भारत

  • इंग्लंड

  • दक्षिण आफ्रिका

  • न्यूझीलंड

Surya Kumar Yadav
SA vs IND 3rd T20I : कुलदीपचा पंजा! भारताचा टी 20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय

यशस्वी जयस्वाल अन् शुभमन गिलने 2 षटकात 29 धावा करून चांगली सुरूवात केली होती. मात्र केशव महाराजने तिसऱ्या षटकात गिलला 12 तर तिलक वर्माला शुन्यावर असं पाठोपाठ बाद केलं. त्यानंतर आलेल्या सूर्याने यशस्वीला उत्तम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची खणखणीत भागीदारी रचली.

दरम्यान, 41 चेंडूत 60 धावा केल्यानंतर यशस्वी बाद झाला. त्याला तबरेज शम्सीने बाद केलं. यशस्वी बाद झाला त्यावेळी भारताने 141 धावांचा टप्पा पार केला होता. यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या सूर्याने डावाची आपल्या हातात घेतली. त्याने रिंकू सिंहसोबत 49 धावांची भागीदारी रचत संघाला 200 च्या जवळ पोहचवले.

कर्णधार सूर्यकुमार देखील आपल्या शतकाजवळ पोहचला होता. त्याने आपले शतक 55 चेंडूत पूर्ण केलं. सूर्याने 20 व्या षटकात हे शतक पूर्ण केले. सूर्याचे हे टी 20 मधील चौथं शतक होतंं. मात्र शतकानंतर पुढच्याच चेंडूवर बाद झाला. अखेर भारताने 20 षटकात 6 बाद 201 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.