Surya Kumar Yadav : धोनीलाही टाकलं मागं; कर्णधार सूर्यानं रोहितलाही जे जमलं नाही ते करून दाखवलं

Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav esakal
Updated on

Surya Kumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या पहिल्या दोन विकेट्स पहिल्या दोन षटकात गेल्या असतानाही डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवत सामन्यात भारताचे वर्चस्व निर्माण केले. याचबरोबर सूर्याने अनेक विक्रम देखील केले.

सूर्यकुमार यादवने टी 20 मधील 2000 धावा पूर्ण केल्याच याचबरोबर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम देखील मागे टाकला. आता दक्षिण आफ्रिकेत टी 20 क्रिकेटमध्ये भारताच्या कर्णधाराकडून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. सूर्याने 36 चेंडूत 56 धावा केल्या. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने 2007 मध्ये 45 आणि 36 धावा केल्या होत्या.

Surya Kumar Yadav
Ravi Bishnoi : आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या खेळाडूलाच सूर्यानं दिला डच्चू

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी 20 सामन्यात 2 बाद 6 धावांवरून डाव सावरला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मासोबत 49 धावांची भागीदारी रचत संघाची धावगती 10 च्या पुढे ठेवली. पॉवर प्लेमध्येच भारताने 55 धावांचा टप्पा पार केल्यानंतर

तिलक वर्माने सूर्याची साथ सोडली. दरम्यान, सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमधील आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. तो आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. विराट कोहली आणि सूर्याने 56 डावातच ही कामगिरी केली आहे. हे दोघेही यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा पूर्ण कण्याऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचे दोन फलंदाज बाबर आझम (52 डाव) आणि मोहम्मद रिझवान (52 डाव) हे संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. तर केएल राहुल 58 डावात 2000 धावा पूर्ण करत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav : सूर्याची 'विराट' सारखी कामगिरी; टी 20 मध्ये दिग्गजांच्या पंक्तीत सामील

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार यादवने तिलक वर्मानंतर (20 चेंडूत 29 धावा) रिंकू सिंह सोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, 36 चेंडूत 56 धावा करणारा सूर्या बाद झाला. त्यानंतर रिंकूने दमदार अर्धशतक ठोकत संघाला 180 धावांपर्यंत पोहचवले. रिंकूने 39 चेंडूत नाबाद 68 धावा ठोकल्या. त्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.