Ind vs Aus T20 Series : टीम इंडियाचे कर्णधारपद सूर्याकडे देण्यावरून गदारोळ, 'या' दोन खेळाडूंवर अन्याय?

Ind vs Aus T20 Series
Ind vs Aus T20 SeriesSAKAL
Updated on

Ind vs Aus T20 Series : भारताची एकदिवसीय वर्ल्ड कपची मोहीम आता संपली आहे. आता संघाच्या नजरा 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहेत. या मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर गदारोळ सुरू झाला.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीवर भारतीय चाहते नाराज असल्याचे दिसत आहे. समितीने या मालिकेसाठी टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादवची टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. यामुळे चाहते संतप्त झाले असून सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत.

Ind vs Aus T20 Series
Ind Vs Aus T20:भारत पराभवाचा वचपा काढणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व

सूर्यकुमार यादव एकदिवसीय वर्ल्ड कप संघाचा एक भाग होता, पण काही विशेष करू शकला नाही. या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या बॅटतून त्याला अर्धशतकही करता आले नाही. अंतिम फेरीत त्याला संघासाठी मोठी खेळी खेळण्याची संधी होती. पण सूर्यकुमार त्यात अपयशी ठरला.

यानंतरही निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. याचे एक कारण म्हणजे सूर्यकुमार हा टी-20 मधील सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र सूर्यकुमारला कर्णधार करण्यात आलेले चाहत्यांना नाराज आहेत.

संघाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली का तर सूर्याला कर्णधार केले. संजू सॅमसनचीही या संघात निवड न झाल्यामुळे चाहते संतापलेले दिसत होते. संजू सॅमसनची वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघात निवड झाली होती. यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावरही गेला होता पण यावेळी त्याची संघात निवड झाली नाही. यामुळे संजूचे चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत.

अक्षर पटेललाही या संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे त्याची वनडे वर्ल्ड कप संघात निवड झाली नाही. सूर्यकुमारच्या जागी अक्षर पटेलला या संघाचा कर्णधार बनवायचे होते, असे अनेक चाहत्यांना वाटते.

संजू सॅमसनला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात होते. मात्र त्याची संघात सातत्याने निवड झाली नाही. तो संघात आता बाहेर कर आहे. संजूला अनेक संधी देण्यात आल्या पण त्याचे तो फायदा घेऊ शकला नाही. आणि त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाची निवड झाली असतानाही संजूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने चाहतेही संतापले होते. यावेळीही संजूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.