Suryakumar Yadav : सूर्या अन् ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूचं ट्विटरवर हे काय चाललंय?

सोशल मीडियावर हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहेत.
Suryakumar Yadav Gets Epic Reply From Woman Cricketer On Hello Wellington
Suryakumar Yadav Gets Epic Reply From Woman Cricketer On Hello Wellingtonsakl
Updated on

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने 2022 च्या टी-20 विश्वचषक मध्ये आपल्या धडाकेबाज फॉर्मने सर्वांना प्रभावित केले. सहा सामन्यांमध्ये त्याने 189.68 च्या स्ट्राइक रेटने एकूण 239 धावा केल्या. टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव झाला. शेवट निराशाजनक झाला असला तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी सूर्यकुमार सारखा धडाकेबाज फलंदाज उदयास आला. टीम इंडियाने ICC मेगा इव्हेंटमधून बाहेर पडली आहे, आता 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20I आणि ODI मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

Suryakumar Yadav Gets Epic Reply From Woman Cricketer On Hello Wellington
Sania Mirza-Shoaib Malik: पब्लिसिटी स्टंट? घटस्फोटाची चर्चा असताना सानिया-शोएबची मोठी घोषणा!

यादरम्यान सूर्यकुमारने ट्विटरवर "हॅलो वेलिंग्टन" लिहिले. ज्याने किवीजविरुद्धच्या मालिकेसाठी आपला उत्साह दर्शविला, कारण टी-20 चा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार आहे. मात्र दरम्यान ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू अमांडा वेलिंग्टनने प्रत्युत्तरात "हॅलो यादव" असे लिहिले. हे मजेदार ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Suryakumar Yadav Gets Epic Reply From Woman Cricketer On Hello Wellington
Sam Curran : धोनीच्या पठ्ठ्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले

भारतीय संघाची 2024 मध्ये होणार असलेल्या टी-20 विश्‍वकरंडकाची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हार्दिक पंड्याकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन याच्याकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 2023 मध्ये भारतामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी भारताच्या संघ बांधणीकडे लक्ष दिले जात आहे. भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचे बांगलादेश दौऱ्याने पुनरागमन होईल.

Suryakumar Yadav Gets Epic Reply From Woman Cricketer On Hello Wellington
Shoaib Akhtar : पाकिस्तानी गोलंदाज भारतासारखे नाहीत; शोएब अख्तर पुन्हा बरळला

भारत - न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

  • टी-20 मालिका

    18 नोव्हेंबर - पहिली टी-20, वेलिंग्टन

    20 नोव्हेंबर - दुसरी टी-20, माऊंट मॉनगनुई

    22 नोव्हेंबर - तिसरी टी-20, नेपियर

  • एकदिवसीय मालिका

    25 नोव्हेंबर - पहिली वन डे, ऑकलंड

    27 नोव्हेंबर - दुसरी वन डे, हॅमिल्टन

    30 नोव्हेंबर - तिसरी वन डे, ख्राईस्टचर्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.