Suryakumar Yadav : एकटा सूर्याच तळपला! निर्णायक विंडीजच्या गोलंदाजांनी दम दाखवला

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav esakal
Updated on

Suryakumar Yadav : भारताने वेस्ट इंडीजविरूद्धच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या. भारताकडून उपकर्णधार सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत 61 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आला नाही. विंडीजच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने भारतला धक्के दिले. वेस्ट इंडीजकडून रोमारियो शेफर्डने 4 विकेट्स घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

भारताने मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या पाचव्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र विंडीजचा फिरकीपटू अकील हुसैनने पहिल्याच षटकात यशस्वी जैसवालला (5) बाद केले. त्यानंतर अकीलने आपल्या पुढच्याच्या षटकात दुसरा सलामीवीर शुभमन गिलची 9 धावांवर शिकार करत भारताची अवस्था 2 बाद 17 धावा अशी केली.

मात्र यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरला. या दोघांनी दोन विकेट्स गेल्या असतानाही आक्रमक फलंदाजी करत पॉवर प्लेमध्येच भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेणार असे वाटत असतानाच रोस्टन चेसने तिलक वर्माला 27 धावांवर बाद केले.

तिलक बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांना फार मोठी खेळी करता आली नाही. रोमारियो शेफर्डने भेदक मारा करत संजू सॅमसन (13), हार्दिक पांड्या (14), अर्शदीप सिंग (8), कुलदीप यादव (0) अशा चार शिकार केल्या. दरम्यान, दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 19 व्या षटकात होल्डरने त्याची खेळी 61 धावांवर संपुष्टात आणली.

सूर्या बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने 10 चेंडूत 13 धावा करत भारताला 160 धावा पार करून दिल्या. मुकेश कुमारने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताला 165 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.