Suryakumar Yadav : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली. अय्यर, गिल यांच्या शतकी धमाक्यानंतर केएलने आक्रमक अर्धशतक ठोकले. तर त्याच्या जोडीला आलेल्या सूर्यकुमार यादवने तर 44 व्या षटकात धुमाकूळच घातला. त्याने कॅमरून ग्रीनच्या या षटकात पहिल्या चार चेंडूत चार षटकार ठोकले. या षटकात सूर्याने 26 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षभरात भारताच्या टी 20 संघात आपले बस्तान बसवले. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाचे उपकर्णधारपदही पटकावले. मात्र टी 20 प्रमाणे त्याला वनडे क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करता आले नव्हते. त्याला वनडेमध्ये कशा पद्धतीने खेळावे याचा उलगडा होत नव्हता.
अखेर सूर्यकुमार यादवला वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाले. त्याने आपण वर्ल्डकपच्या संघात बसतो हे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत सिद्ध करून दाखवले. पहिल्या वनडे सामन्यात त्याने नाबाद खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात 36 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.