Suryakumar Yadav: सूर्याने श्रीलंकेची केली धुलाई! अन् ठोकले तिसऱ्यांदा शतक

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav
Updated on

Suryakumar Yadav Century vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्ध शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादवने इतकी तांडव केला. 2023 साली टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर धुमाकूळ घातला आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

Suryakumar Yadav
IND vs SL: एका ओव्हरमध्ये मारले होते 7 षटकार! मात्र कॅप्टन पांड्याने संपवले करिअर?

या सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा टीम इंडियाने 52 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या बॅटच्या चाहत्यांना मैदानावर स्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 112 धावा केल्या. या शतकी खेळीत सूर्यकुमार यादवने 7 चौकार आणि 9 षटकार मारले.

Suryakumar Yadav
Team India: BCCI नाही तर... राहुल द्रविडच उठलाय रोहित-विराटच्या मुळावर

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने भारतासाठी एकूण 4 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवचे हे तिसरे टी-20 शतक आहे. यासह हा आकडा स्पर्श करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याशिवाय केएल राहुलने 2 टी-20 शतके झळकावली आहेत. विराट कोहली आणि दीपक हुड्डा यांनीही भारताकडून 1-1 शतके झळकावली आहेत.

Suryakumar Yadav
BCCI Chief Selector: चेतन शर्मा होणार कोट्याधीश! समितीचे सदस्य किती घेणार पगार, जाणून घ्या एका क्लिकवर

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक झळकावले. इंग्लंडविरुद्ध त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने 48 चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध या वर्षाच्या अखेरीस माउंट माउंगानुई येथे शतक झळकावले. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी खेळली होती. सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूत शतक पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.