Team India: रोहित-हार्दिक नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार! धक्कादायक अपडेट आले समोर

 Hardik Pandya Will Not Captain Team India In Ireland T20 series suryakumar yadav may be captain
Hardik Pandya Will Not Captain Team India In Ireland T20 series suryakumar yadav may be captain
Updated on

Team India In Ireland T20 series : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळवले जातील. कॅरेबियन दौऱ्यानंतर लगेचच टीम इंडिया ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आल्याने टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची अपेक्षा आहे.

 Hardik Pandya Will Not Captain Team India In Ireland T20 series suryakumar yadav may be captain
Wi vs Ind : कोहलीला भेटल्यानंतर 'या' खेळाडूची आई लागली रडायला, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेत खेळणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार कोण हा मोठा प्रश्न आहे, कारण लवकरच भारताला श्रीलंकेला जाणार आहे, कारण तिथे आशिया कप 2023 खेळल्या जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध कॅंडी येथे होणार आहे. यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.

 Hardik Pandya Will Not Captain Team India In Ireland T20 series suryakumar yadav may be captain
IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत अन् बांगलादेशचे खेळाडू चालू सामन्यात मैदानावर भिडले अन्... Video

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता अशा परिस्थितीत सूर्यकुमार आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो सध्या टी-20 संघाचा उपकर्णधार आहे. जर तो कर्णधार झाला तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारू शकतो, कारण त्याची आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवड केली जाऊ शकते. तो 100 टक्के तंदुरुस्त होण्याच्या जवळपास आहे.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.