Suryakumar Yadav Asia Cup 2022 : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आशिया चषक 2022 मध्ये भारताच्या दुसऱ्या सामन्यात 26 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी खेळली. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. भारताने 94 धावांमध्ये दोन विकेट गमावल्या आणि त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यांनी 98 धावांची भागीदारी केली. विराटने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. भारतीय डावानंतर विराटनेही सूर्याला वाकून नमस्कार केला. विराट कोहलीला ही करताणा पाहून सुर्या स्वतःच चकित झाला.
विराटच्या या वाकून नमस्कार नंतर सूर्या म्हणाला की, हे खूप हृदयस्पर्शी होत. मी हे विराटला आधी असं कधीच पाहिले नव्हत. मी त्याच्याकडे बघत होतो आणि विचार करत होतो की तो पुढे का सरकत नाही? मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला सोबत येण्यास सांगितले, तो खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करण्यात मला मजा येते. मी विराटशी बोललो आणि त्याने मला फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले. माझ्याकडेही फलंदाजीबाबत अतिशय स्पष्ट योजना होत्या, त्यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करण्यात अधिक मजा आली.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला होता. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार आणि तब्बल चौकार मारले. यातील चार षटकार सूर्यकुमारने डावाच्या शेवटच्या षटकात मारले. स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर्याला चांगली साथ दिली. कोहली आणि सूर्या यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची नाबाद भागीदारी केली. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 2 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करू शकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.