IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध रचला इतिहास; गिलपासून सूर्यापर्यंत सर्वच हिट

IND vs AUS
IND vs AUSESAKAL
Updated on

IND vs AUS 2nd ODI : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 50 षटकात 5 बाद 399 धावा करत मोठा इतिहास रचला. भारताची ही ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 383 धावा उभारल्या होत्या.

IND vs AUS
Suryakumar Yadav : 6, 6, 6, 6, 1, 1 षटकारांचा चौकार! सूर्या वनडेत फिट, स्लॉग ऑव्हरमध्ये मोठा धमाका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कांगारूंचे नेतृत्व करणाऱ्या स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतली. मात्र इथूनच कांगारू बॅकफूटवर गेले. जरी ऋतुराजच्या रूपाने कांगारूंना भारताची पहिली विकेट घेण्यात यश आले असले तरी त्यांना भारताची दुसरी विकेट घ्यायला 200 धावा वाट पाहावी लागली.

या 200 धावांच्या दरम्यान, श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले होते तर शुभमन गिल आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. गिलने देखील आपले सहावे वनडे शतक पूर्ण करत भारताला 30 षटकात 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

IND vs AUS
KL Rahul Six : आता बॉल कोण शोधणार... कर्णधार होताच राहुलने दाखवले आपले रंग, कपिल देव स्टँडचे छत हादरले

गिल आणि अय्यरने रचलेल्या भक्कम पायावर केएल राहुल, इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने सोनेरी कळस चढवला. केएल 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशनने 18 चेंडूत 31 धावा ठोकत राहुलसोबत अर्धशतकी (59) भागीदारी रचली.

यानंतर राहुलने सूर्यकुमारसोबत 53 धावांची भागीदारी रचत भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला. 41 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने 37 चेंडूत नाबाद 72 धावा ठोकल्या. याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 50 षटकात 5 बाद 399 धावा उभारल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.