Suryakumar Yadav : मॅचपूर्वीची झोप, वानखेडेचं मैदान अन्...; सूर्याने उघड केलं फटकेबाजीमागचं गुपित

इथं गोलंदाजांचं डोकं चक्रावलंय अन् सूर्या म्हणतो की मी काहीच वेगळं...
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav
Updated on

Suryakumar Yadav T20 World Cup 2022 : भारतीय संघाचा स्टार मिडल ऑर्डर बॅट्समन सूर्यकुमार यादवची बॅट आजकाल जोरदार चालत आहे. आपली दहशत आणि विरोधी गोलंदाजांमधील दबदबा कायम राखत सूर्याने पुन्हा एकदा झटपट अर्धशतक केले. यावेळी त्याने टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध कठीण काळात हे अर्धशतक केले आहे. सूर्याने 25 चेंडूत तुफानी खेळी खेळत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने 5 विकेट्सवर 186 धावांची मोठी मजल मारली. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला सामनावीराचा किताब देण्यात आला.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav : सूर्याने इतिहास रचला! एका वर्षात हजारी मनसबदारी!

सूर्याकुमार यादव सामना संपल्यावर म्हणतो, मी काहीच वेगळे केले नाही. मी नेटमध्ये सरावादरम्यान जशी बॅटिंग करतो तसंच मी मैदाना वरही करतो. शून्यापासून सुरूवात करायचीये हा विचार माझ्या डोक्यात असतो. त्यानुसार मी बॅटिंग करत जातो. प्रतिस्पर्धी संघाने फिल्डिंग कशी लावलीये हे पाहतो. जोरदार फटके मारण्याऐवजी चांगली फटकेबाजी करण्यावर भर देतो. यातून एखादा षटकार मारला तर फायदाच होईल हे माहिती असते.

विकेट किपरच्या डोक्यावरुन षटकार कसा काय मारु शकतो असा प्रश्न इरफान पठाणने विचारला असता सूर्यकुमारने सांगितले की, काही शॉट्स हे ठरवून मारतो. गोलंदाजांच्या डोक्यात काय सुरूये हे बघतो. क्रिझमध्ये फिरत राहतो. त्यामुळे गोलंदाजांना लय सापडत नाही. मी प्रत्येक सामन्यापूर्वी अर्धा ते पाऊण तास झोपतो. यामुळे मी मैदानात आत्मविश्वासाने फलंदाजी करतो.

Suryakumar Yadav
IND vs ZIM : ग्रुप 2 मध्ये भारतच किंग! पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावले

भीती वाटते पण...

वेगवान गोलंदाजाला स्वीप शॉट मारताना छाती किंवा डोक्यावर बॉल लागण्याची भीती नाही का वाटत, यावर सूर्यकुमारने उत्तर दिले. नेटमध्ये सरावादरम्यान माझ्या डोक्यावर बॉल लागलाय. यामुळे दुखापतीही झाल्यात. भीती वाटते पण मी खेळत राहतो. फलंदाजीत सुधारणा करत राहतो, असे त्याने सांगितले.

वानखेडेतला सराव ठरतो महत्त्वाचा

2020 च्या वर्ल्डकपमध्ये संघात स्थान मिळाले नव्हते. त्यावेळी सूर्यकुमारने नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्ल्डकपमधील कामगिरी आणि तयारीबाबत काय सांगशील, असा प्रश्न सूर्याला विचारण्यात आला. ‘कामगिरीमुळे आनंद होतोय. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण आहे याची जाणीव आहे. मुंबईत मी वानखेडे स्टेडियमवर सराव करतो. ते मैदान ऑस्ट्रेलियाच्या मैदानांइतकं मोठं नाही. पण खेळपट्टीवर बाऊन्स जास्त आहे. याशिवाय पारसी जिमखाना येथील मैदानावरही आम्ही अशीच खेळपट्टी तयार करतो. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियात झाला.

Suryakumar Yadav
T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार?

१० दिवसांचा कॅम्प महत्त्वाचा ठरला

गेल्या दोन–तीन महिन्यांपासून आम्ही सर्वजण एकत्र खेळतोय. याशिवाय वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी आम्ही 10 दिवस पर्थमध्ये होतो. तो ट्रेनिंग कॅम्पही महत्त्वाचा ठरला असे यादवने सांगितले.

रोहितने दिलाय हा सल्ला

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांचे नाते सर्वांनाच माहितीये. याबाबात प्रश्न विचारला असता त्याने सांगितले, रोहित शर्माने मला मैदानात मोकळीक दिलीये. तुला हवी तशी फलंदाजी कर असं त्याने मला सांगितलंय. क्षेत्ररक्षणादरम्यानही मी त्याला सल्ला देतो. मी दिलेला सल्ला ऐकणं किंवा न ऐकणं हे रोहितच्या हातात असते.

360 Degree खेळाडू एकच

सूर्यकुमार यादवची द.आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याच्याशी नेहमीच तुलना केली जाते. यावर सूर्या प्रांजळपणे सांगतो, 360 डिग्रीत खेळणारा खेळाडू एकच आहे. मी तर फक्त त्यांच्याकडून शिकतो. त्यांच्यासारखं खेळण्याचा प्रयत्न करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.