Suryakumar Yadav : अखेर सूर्योदय झाला! मुंबई इंडियन्सच्या जोडीनं हार्दिकची लाज वाचवली; आव्हान ठेवलं जिवंत

Suryakumar Yadav Tilak Varma
Suryakumar Yadav Tilak Varmaesakal
Updated on

Suryakumar Yadav Tilak Varma : भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत सलग तिसऱ्या पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र मुंबई इंडियन्सची जोडी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मिळून हार्दिक पांड्याचं नाक कापण्यापासून वाचवलं.

भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने ठेवलेले 160 धावांचे आव्हान 18 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. वनडे मालिका आणि पहिल्या दोन टी 20 सामन्यात फेल गेल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादवने आपल्या भात्यातून एकापेक्षा एक भारी फटके काढत 44 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. (India Vs West Indies 3rd T20I)

Suryakumar Yadav Tilak Varma
Suryakumar Yadav : अखेर सूर्योदय झाला! मुंबई इंडियन्सच्या जोडीनं हार्दिकची लाज वाचवली; आव्हान ठेवलं जिवंत

त्याने ही आपली खेळी 10 चौकार आणि 4 षटकारांनी सजवली. त्याने तिलक वर्मासोबत 87 धावांची भागीदारी रचली. सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्माने सामना शेवटपर्यंत नेला. त्याने 37 चेंडूत नाबाद 49 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

भारताला विजयासाठी 2 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने षटकार मारला. त्याने तिलकचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 1 धावेची गरज असताना ही संधी त्याला दिली नाही.

Suryakumar Yadav Tilak Varma
BCCI Income Tax : जेवढा एका कंपनीचा टर्न ओव्हर नसतो तितका BCCI ने इन्कम टॅक्स भरला

वेस्ट इंडीजने 20 षटकात 5 बाद 159 धावा करत भारताला चांगले आव्हान दिले होते. कर्णधार रोव्हमन पॉवेलच्या 40 आणि सलामीवीर ब्रँडन किंगच्या 42 धावांच्या जोरावर विंडीजने भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान पार करताना भारताने आपले दोन्ही सलामीवी लवकर गमावले. पहिल्याच षटकात पदार्पण करणारा यशस्वी जैसवाल 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी सुरू केली.

Suryakumar Yadav Tilak Varma
Kuldeep Yadav : अखेर कुलदीप यादवने विंडीजचा धडाका रोखला तरी भारताला चेस करावं लागणार अवघड टार्गेट

मात्र शुभमन गिलने 6 धावा करत त्याची साथ सोडली. परंतु सूर्यकुमार यादवने मात्र आपला धडाका कायम ठेवला. त्याला तिलक वर्माने देखील आक्रमक साथ दिली. सूर्याने 23 चेंडूत 50 धावा ठोकत भारताला विजयीपथावर नेले.

अखेर विजयासाठी 39 आणि सूर्यांच्या शतकासाठी फक्त 17 धावांची गरज असताना अल्झारी जोसेफने सूर्याला बाद केले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा स्टार तिलक वर्माने नाबाद 49 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()