पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती.
नवी दिल्ली- पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती. सुशील कुमार सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरु आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित केले जात आहे, असं उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दिपक कुमार यांनी सांगितलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Sushil Kumar suspended from his job at Northern Railways Sagar Dhankar Murder Case)
रेल्वेच्या सेवेतून निलंबित झाल्यानंतर त्याचा पद्मश्रीही भारत सरकार मागे घेणार का? अशी चर्चा सुरु झाली. क्रीडा जगतातील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पण, पद्मश्री पुरस्कार (padma award) रद्द करण्याचा असा कोणताही नियम स्पष्ट नाही. त्याचबरोबर याआधी कोणत्याही पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तीने इतका गंभीर गुन्हा केला नाही. त्यामुळे सरकारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या निर्णायाबाबत सध्या संयम ठेवला जाण्याची शक्यता आहे. असा कोणताही नियम नसल्यामुळे गजाआड असणाऱ्या सुशीलकुमारकडून तातडीनं पुरस्कार परत घेतला जाणार नाही.
युवा कुस्तीपटू सागर धनखड यांची हत्याप्रकरणी सुशीलकुमारल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुशीलकुमारवर हत्या, मारहाण आणि हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुशीलकुमारने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या सुशील कुमार याला २०११ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.