Inspirational Story : शार्कच्या हल्ल्यात पाय गमावला, पण ती डगमगली नाही; १५ महिन्यांत Ali Truwit पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी झाली सज्ज

Paralympic 2024 Ali Truwit Swimming: पॅरिसमध्ये उद्यापासून पॅरिलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेत आपल्या दिव्यांगत्वावर मात करून अनेक खेळाडू सुवर्णपदकासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. त्यांची जिद्द अन् इथवरचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे.
Paralympic 2024 Ali Truwit Swimming
Paralympic 2024 Ali Truwit Swimmingesakal
Updated on

Paris Paralympic 2024 Ali Truwit inspirational Journey : पॅरालिम्पिक ही फक्त एक स्पर्धा नाही, तर प्रेरणा देणारा वाहता झरा आहे... या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू हा दिव्यांग आहे, परंतु त्याची खंत न बाळगता नव्या उमेदीने उभं राहून अनेकांना प्रेरित करण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळेच पॅरिलिम्पिक ही स्पर्धा खूप खास ठरते. या स्पर्धेत २४ वर्षीय जलतरणपटू ॲली ट्रुविट सहभागी झाली आहे. मे २०२३ मध्ये सुट्टीवर असताना snorkeling करताना शार्कने तिच्यावर हल्ला केला, त्यात तिला डाव्या पायाचा गुडघ्याखालचा भाग गमवावा लागला. पण, पाण्याची ओढ तिला काही शांत बसू देत नव्हती आणि एक दिवस तिने धाडसी निर्णय घेतला...

ॲलेक्झांड्रा ट्रुविट ही अमेरिकन जलतरणपटू आहे आणि ३१ मे २००० सालचा तिचा जन्म. ट्रुविटची आई जॉडी या १९९१ मध्ये येलच्या महिला जलतरण आणि डायव्हिंग संघाची कर्णधार होत्या. ॲलीने मे २०२३ मध्ये येल विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर दोन दिवसांनी ती मैत्रिण सोफी पिलकिंटनसोबत तुर्क आणि कैकोस बेटांवर सुट्टीवर गेली होती. कॅरिबियन समुद्रात स्नॉर्कलिंग करताना तिच्यावर शार्कने हल्ला केला. शार्कने तिच्या पायाचे गुडघ्यापासून खाली लचके तोडले.

Paralympic 2024 Ali Truwit Swimming
Paris Paralympic: ८४ खेळाडू अन्‌ ९५ अधिकारी; पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक सज्ज

रक्तबंबाळ झालेल्या ॲलीला स्वतःचा जीव वाचवून बोटीवर परतण्यासाठी ५० ते ७५ यार्ड पोहावे लागले. बोटीवर परतल्यानंतर मैत्रिणीने ॲलीच्या पायावर होणारा रक्तस्राव थांबवला. त्यानंतर तिला मियामीच्या हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. तेथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, वाढदिवशी तिचा पाय गुडघ्याच्या खाली कापून टाकण्यात आला. त्यानंतर मित्र आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याने ती पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागली. वर्षभरात तिने स्वतःला पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी तयार केले आणि पॅरिसमध्ये ती पदकासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहे.

शार्कचा हल्ला अन् जीव वाचवण्याचा प्रयत्न

ॲलीने एका मुलाखतीत तिच्या वाट्याला आलेला अनुभव व्यक्त केला,''एक शार्क जवळ आला आणि आमच्यावर हल्ला करू लागला. आक्रमकपणे त्याने मला आदळले आणि मला भिरकावले आणि आम्ही झुंज दिली. त्या शार्कला मागे ढकलले आणि लाथ मारली. पण, माझा पाय त्याच्या तोंडात आला आणि काही कळण्याआधी त्याने माझ्या पायाचा आणि काही भाग चावा घेतला होता."

हॉस्पिटलमधून बाहेर पडली अन्...

तिने पुढे सांगितले की,''मला आठवते की मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि मी माझ्या पालकांना माझे सर्व शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट व लहान कपडे फेकण्यास सांगितले. कारण, मला माझा कृत्रिम पाय कोणीही पाहू नये असे मला वाटत होते. या अपघातानंतर या जागेतील रिकामेपणाने मला माझा आत्मविश्वास परत दिला.'' त्यानंतर ॲलीने पुन्हा जलतरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने सरावाला सुरुवात केली.

तिला पाच ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या केट डौग्लासने मदत केली आणि ॲलीकडून सराव करून घेतला. १२ वर्षांची असल्यापासून ॲलीला ओळखणाऱ्या माजी प्रशिक्षक जॅमी बारोन निवृत्तीमागे घेत मदतीचा हात पुढे केला. तिने मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत १ मिनिट ०८.९८ सेकंदाची वेळ नोंदवून पॅरालिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली.

शार्कच्या हल्ल्यानंतर १५ महिन्यांच्या आत तिने १०० मीटर व ४०० मीटर फ्री स्टाईल व १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.