Jacques Kallis T10 : दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने आपला दांडपट्टा सुरू केल्यावर गोलंदाजांची पळता भुई थोडी व्हायची. या जॅक कॅलिसने 2014 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
जॅक कॅलिस हा आता 47 वर्षांचा झाला आहे. मात्र त्याच्या बॅटची धार अजून कमी झालेली नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे युएस मास्टर टी 10 लीगमध्ये त्याने केलेली आक्रमक खेळी आहे.
अमेरिकेच्या टी 10 लीगमध्ये कॅलिफोर्निया नाईट्स आणि टेक्सास चार्जर्स यांच्यात सामना झाला. कॅलिक हा कॅलिफोर्नियाकडून सलामीला उतरला होता. त्याच्या सोबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच देखील होता. मात्र फिंच केवळ 2 धावा करून बाद झाला. यानंतर कॅलिसने तुफानी खेळी करण्यास सुरुवात केली. त्याला मिलिंग कुमारने चांगली साथ दिली.
47 वर्षाच्या जॅक कलिसने 31 चेंडूत 64 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. कॅलिसची स्ट्राईक रेट 206.45 इतकी होती. जॅक कॅलिसने मिलिंदला साथीला घेत शतकी भागीदारी रचली. मिलिंद कुमारने 28 चेंडूत 76 धावा ठोकल्या. कुमारने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. मिलिंद आणि कॅलिसच्या या भागीदारीमुळे कॅलिफोर्नियाला 158 धावा उभारता आल्या.
कॅलिफॉर्निलाया मिळाला पहिला विजय
टेक्सास चार्जर्सने कॅलिफॉर्निया संघाच्या धडाक्यासमोर गुडघे टेकल, टी 20 षटकाच्या सामन्यात टेक्सासला 8 बाद 110 धावांपर्यंतच मजल मारता आली. टेक्सासकडून मुख्तार अहदमने 33, बेन डेकने 18 तर उपल थरंगाने 27 धावा केल्या. यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
कॅलिफॉर्नियाकजून अॅश्ले नर्सने 3 विकेट्स घेतल्या. या लीगमधील कॅलिफॉर्नियाचा पहिला विजय आहे. कॅलिफॉर्नियाचा हा या लीगमधील पहिला विजय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.