शारज : पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या आशिया खंडातील श्रीलंका आणि बांगलादेशला ‘सुपर-१२’ मध्ये सलामीला एकमेकांविरुद्ध लढावे लागणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील ‘अ’ गट ‘डेथ ग्रुप ऑफ डेथ’ असल्यामुळे येथे एखादा पराभव वाटचालीला ब्रेक लावणारा ठरणारा आहे.
माजी विजेते असले तरी यंदा पात्रता फेरीत खेळण्याची वेळ श्रीलंकेवर आली, परंतु त्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे शानदार कामगिरी केली. मात्र बांगलादेशला पात्रता फेरीत सलामीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. पापुआ न्यू गिनी या दुबळ्या संघावर मोठा विजय मिळवून त्यांनी मुख्य स्पर्धेत प्रवेश केला असला तरी त्यांची फलंदाजी अजूनही डळमळीत आहे. श्रीलंकेचा संघ ४८ तासांत दुसरा सामना खेळणार आहे. काल त्यांचा संघ पात्रता फेरीतील अखेरचा सामना खेळला होता, परंतु एकतर्फी विजयामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे.
आमने सामने ‘वर्ल्डकप’मध्ये
सामना १, विजय १
सर्वाधिक धावा : १४७ : ८३
नीचांकी : १४७ : ८३
ट्वेन्टी-२० क्रिकेट
एकूण सामने ११
विजय : श्रीलंका ७ : बांगलादेश ४
श्रीलंका विजयाची सरासरी ६३.६४ %
बांगलादेश विजयाची सरासरी ३६.३६ %
पहिला सामना : १८ सप्टेंबर २००७
अखेरचा सामना : १६ मार्च २०१८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.