Australia Weather : ऑस्ट्रेलियातील T20 वर्ल्डकप पाण्यात; इनडोअर स्टेडियमचं घोडं कुठं अडलं?

T20 World Cup 2022 Australia Rainy Weather Indoor Stadium Option
T20 World Cup 2022 Australia Rainy Weather Indoor Stadium Option esakal
Updated on

Australia Weather T20 World Cup 2022 Indoor Stadium : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरीतील संघ देखील तगडी झुंज देत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील बेभरवशाचं हवामान या सर्व रोमांचकारी सामन्यावर पाणी फेरत आहे. अजून सुपर 12 फेरीचे निम्मा देखील सामने झालेले नाहीत तोपर्यंत मेलबर्नमधील तीन आणि हॉबर्टवरील एक असे तब्बल चार सामने वॉश आऊट झाले आहेत. यातील तीन सामने तर एकही चेंडू न खेळवता, टॉसही न होता रद्द झाले आहेत. यामुळे चाहत्यांची घोर निराशा होत आहे. जागितक हवामान बदलाचा हा परिणाम असून ऑस्ट्रेलियात उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसाचा फटका आता इथून पुढे प्रत्येक मोठ्या स्पर्धेत बसणार आहे. क्रिकेटला याची जास्त झळ पोहचते कारण क्रिकेटमध्ये मैदान आणि खेळपट्टी सामना होण्यासाठी अत्यंत महत्वाची असते.

T20 World Cup 2022 Australia Rainy Weather Indoor Stadium Option
NZ vs SL : ग्लेन फिलिप्सचे झुंजार शतक, एकट्यानेच केली लंकेची धुलाई

दरम्यान, या सततच्या पावसावर इन डोअर स्टेडियम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी देखील आयसीसीला हाच सल्ला दिला आहे. ते म्हणाला की, 'जर मेलबर्नमध्ये सतत पाऊस पडत असेल तर आपल्याकडे डॉकलँड्स स्टेडियमचा एक पर्याय उपलब्ध आहे. हे इनडोअर स्टेडियम आहे. मात्र आपले सामने त्या मैदानावर खेळवायचे की नाही हा निर्णय आयसीसीने घ्याचा आहे.' डॉकलँड्सचे इनडोअर क्रिकेट स्टेडियम हे मेलबर्नपासून जवळपास 5 किमी अंतरावर आहे. या स्टेडियमला छताची सुविधा आहे. त्यामुळे जरी पाऊस आला तरी सामन्यावर याचा काही फरक पडणार नाही.

22 वर्षापूर्वी झाला होता पावसालाही मात देण्याचा पहिला प्रयत्न

क्रिकेट सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय कामयचा दूर करण्यासाठी 22 वर्षापूर्वी पहिला प्रयत्न झाला होता. यावेळीच इंडोअर क्रिकेटची संकल्पना अस्तित्वा आली होती. 16 ऑगस्ट 2000 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इनडोअर स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. हा सामना मेलबर्नमधील याच डॉकलँड्स स्टेडियमवर झाला होता.

हा ऐतिहासिक पहिला इनडोअर आंतरराष्ट्रीय वनडे सामने् ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 94 धावांनी जिंकला. कर्णधार स्टीव्ह वॉने नाबाद 114 धावांची आणि मायकल बेवनने नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 295 धावा केल्या होत्या. तर शॉन पोलॉकच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकात 7 बाद 201 धावांपर्यंतच मजल मारता आली.

या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 48 हजार इतकी आहे. मात्र थंडीमुळे 25 हजार 785 प्रेक्षकच या सामन्याला हजर होते. या स्टेडियमचे छत हे 38 मीटर उंचीवर आहे.

डॉकलँड्स स्टेडियमवर झाले फक्त 12 आंतरराष्ट्रीय सामने

अवकाळी पाऊस आणि ओले मैदान याच्यावरचा पर्याय असलेल्या डॉकलँड्स इनडोअर स्टेडियमवर आतापर्यंत फक्त 12 वनडे सामने खेळवण्यात आले. 2000 ते 2006 दरम्यान या मैदानावर 12 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानाची प्रेक्षक क्षमता या स्टेडियमच्या दुप्पट आहे. त्यामुळे डॉकलँड्सची आयोजकांना आठवण फक्त पाऊस आला तरच होते.

T20 World Cup 2022 Australia Rainy Weather Indoor Stadium Option
PAK vs ZIM Shoaib Malik : खुद्द शोएब मलिकने 'डेड बॉल'वरून बाबर सेनेला काढलं वेड्यात

शाहिद आफ्रिदीच्या 'त्या' फटक्याने दाखवून दिल्या इनडोअर स्टेडियमच्या मर्यादा

इंडोअर स्टेडियमची चर्चा होत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या एका फटक्याची चर्चा ही हमकास होते. कार्डिफमधील मिलेनियम स्टेडियमवर शाहिद आफ्रिदीने एक जबदस्त फटका मारला होता. यावेळी चेंडू थेट मैदानाच्या छताला जावून धडकला होता. 2002 मध्ये कार्डिफच्या मिलेनियम स्टेडियमवर द ब्रिट्स आणि रेस्ट ऑफ वर्ल्ड यांच्यात इनडोअर स्टेडियममध्ये पॉवर क्रिकेट नावाचा एक सामना झाला होता. या 16 अ साईड सामनय्ात आफ्रकिदने मॅथ्यू फ्लेमिंगला एक सिक्सर लगावला. या षटकारावर त्याला 12 धावा मिळाल्या होत्या. कारण हा फटका इनडोअर स्टेडियमच्या छताला लागला होता.

ही एक फ्रेंडली मॅच होती म्हणून आफ्रिदीला 12 धावा मिळाल्या. मात्र आयसीसीच्या स्पर्धेत नियमानुसार जर असा चेंडू सीमारेषेच्या आतील बाह्य गोष्टींना धडकला तर तो डेड बॉल म्हणून गणला जातो. अनेकवेळा आपण स्पायडी कॅमला फलंदाजाचा फटका जाऊन बसल्याचे पाहतो. त्यामुळे वास्तवात इनडोअर स्टेडियमच्या देखील काही मर्यादा आहेत. या मर्यादा थेट सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.