VIDEO: डेव्हिड वॉर्नरच्या नशिबाने दिला दगा अन्...

वॉर्नरच्या या दुर्दैवी विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून...
T20 World Cup 2022 David Warner
T20 World Cup 2022 David Warner
Updated on

David Warner Australia vs New Zealand T20 World Cup : T20 विश्वचषकातील सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांच्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले आणि प्रत्युत्तरात कांगारू संघ केवळ 111 धावाच करू शकला.

T20 World Cup 2022 David Warner
T20 World Cup AUS vs NZ : गतविजेच्या ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच सामन्यात 89 धावांनी पराभव

न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य मिळाले होते. अशा स्थितीत कांगारू संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती मात्र ते होऊ शकले नाही. डेव्हिड वॉर्नर बर्‍याच दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे, आणि चाहत्यांना या सामन्यात त्याच्याकडून खूप आशा होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो दुर्दैवी पद्धतीने बाद झाला.

वॉर्नरने टिम साऊदीच्या चेंडूवर लेग साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटला, पॅडला आदळल्यानंतर पुन्हा त्याच्या बॅटला लागला आणि थेट स्टंपमध्ये घुसला. या दुर्दैवी पद्धतीने आऊट झाल्यानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. वॉर्नरच्या या दुर्दैवी विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनाही वॉर्नरबद्दल वाईट वाटत आहे.

T20 World Cup 2022 David Warner
Glenn Phillips | VIDEO : जॉन्टीला विसरा आता! फिल्डिंगचा नवा आयकॉन 'फिलिप्स'

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 200 धावांची मोठी धावसंख्या उभारली. डेव्हॉन कॉनवे आणि फिन अॅलन यांच्याशिवाय जेम्स नीशमने न्यूझीलंडकडून शानदार फलंदाजी केली. कॉनवेने 58 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. त्याचवेळी फिन ऍलनने 16 चेंडूत 42 आणि जेम्स नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दोन आणि झाम्पाने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. ग्लेन मॅक्सवेलने 28 आणि पॅट कमिन्सने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 17.1 षटकात 111 धावांवर आटोपला आणि 89 धावांनी सामना गमावला. न्यूझीलंडच्या टीम साऊदी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी तीन बळी घेतले. ट्रेंट बोल्टला दोन बळी मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.