T20 WC : 'या' अंपायर पासून पाकिस्तानची सुटका नाहीच; सेमी फायनल ठरणार वादग्रस्त?

भारताविरुद्धच्या सामन्यात ज्या पंचाने तो नो-बॉल दिला होता ज्यामुळे वाद निर्माण झाला तो पंच आता...
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022sakal
Updated on

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी-20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर-12 चे साखळी सामने संपले असून आता उपांत्य फेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान हे टॉप-4 संघ आहेत. यातील दोन संघ अंतिम फेरीचा मार्ग निश्चित करतील. दोन्ही उपांत्य फेरीसाठी सामना पंच नियुक्त करण्यात आले आहेत. या अंतर्गत पुन्हा एकदा पाकिस्तानी चाहते अडचणीत येऊ शकतात. कारण भारताविरुद्धच्या सामन्यात ज्या पंचाने तो नो-बॉल दिला होता ज्यामुळे वाद निर्माण झाला. तोच आता पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंपायरिंग करताना दिसणार आहेत.

T20 World Cup 2022
Shoaib Akhtar : रावळपिंडी एक्सप्रेसची टीम इंडियाला धमकी, व्हिडीओ शेअर करत म्हणातो...

उपांत्य फेरी पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना बुधवारी सिडनी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दक्षिण आफ्रिकेचे मारेस इरास्मस आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. तिसरे पंच इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रॉ असतील. तर चौथ्या पंच म्हणून इंग्लंडच्या मायकेल गॉफची नियुक्ती करण्यात आली आहे.

T20 World Cup 2022
Virat Kohli : 'किंग कोहली' पहिल्यांदाच बनला 'ICC 'प्लेयर ऑफ द मंथ', ऑक्टोबर महिना ठरला लकी

पाकिस्तान संघाने या विश्वचषकात मध्ये पहिला सामना भारतीय संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या शेवटच्या षटकात फिरकीपटू मोहम्मद नवाजच्या फुल टॉस बॉलला पंच मारेस इरास्मसने नो-बॉल म्हटले होते. विराट कोहलीने या चेंडूकडे इशारा करत नो-बॉलची मागणी केली होती. कोहलीच्या सांगण्यावरून अंपायरने नो-बॉल दिल्याचा आरोप पाकिस्तानी चाहत्यांनी केला होता. नो-बॉल झाला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

T20 World Cup 2022
Suryakumar Yadav : सुर्या वेगळ्या ग्रहावरचा माणूस! पाकिस्तानी खेळाडूंकडून स्तुती

अॅडलेडच्या मैदानावर दुसरा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रीफेल यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. तिसरा पंच न्यूझीलंडचा ख्रिस गॅफनी असेल. तर ऑस्ट्रेलियाच्या रॉड टकरची चौथ्या पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीचे सामनाधिकारी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.