T20 World Cup 2022 : ट्वेन्टी २० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून सुरू होत असून सलामीलाच श्रीलंकेचा सामना नामिबियाविरुद्ध होत आहे. आशिया विजेतेपद मिळवलेल्या श्रीलंकेला या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवायचे आहे. गेल्या महिन्यात भारत, पाकिस्तान या मातब्बर संघांना हरवून आशिया करंडक जिंकून श्रीलंकेने आपली गाडी रुळावर आणली आहे, पण आता वर्ल्डकपसाठी नव्याने सुरुवात करायची आहे.
जागतिक क्रिकेटमधील श्रीलंकेचा अनुभव पाहता नामिबियाविरुद्ध त्यांचे पारडे जड आहे, परंतु ट्वेन्टी-२० प्रकार असल्यामुळे नामिबियाला दुबळे समजण्याची चूक करणे त्यांना कठीण जाईल. नामिबियाने या स्पर्धेस येण्याअगोदर झिम्बाब्वेचा दोन सामन्यांत पराभव करून तीन सामन्यांची मालिका जिंकली होती. पात्रता स्पर्धेतील आठ संघांची दोन गटांत विभागणी असून अ गटात श्रीलंका आणि ब गटात वेस्ट इंडीज यांचा समावेश आहे. या दोन गटांतून पहिले दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
श्रीलंकेची मदार वानिंदू हसरंगा, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षा यांच्यावर प्रामुख्याने असणार आहे; तर नामिबियाचा सलामीवीर क्रेग विल्यम्स, कर्णधार हार्ड इरास्मस धोकादायक ठरू शकतात. श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात अजूनपर्यंत एकच ट्वेन्टी-२० सामना झाला होता, गतवेळच्या स्पर्धेत झालेल्या त्या सामन्यात नामिबियाला ९६ धावांत गुंडाळल्यानंतर श्रीलंकेने ते आव्हान १४ षटकांच्या आत पार केले होते.
सामन्याची वेळ : स. ९.३० पासून प्राथमिक फेरीची गटवारी
अ गट : श्रीलंका, नामिबिया, नेदरलँडस्, संयुक्त अरब अमिराती
ब गट : वेस्ट इंडीज, आयर्लंड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे
नेदरलँडस् विरुद्ध अमिराती
अ गटात उद्या नेदरलँडस् आणि अमिराती यांच्यात सामना होत आहे. अमिरातीचा संघ अनुभवात उजवा असला तरी नेदरलँडस् धक्कादायक कामगिरी करण्याची क्षमता बागळून आहे. या गटातून मुख्य स्पर्धेसाठी श्रीलंका पात्र ठरण्याची शक्यता अधिक असल्यामुळे दुसऱ्या संघासाठी चुरस असेल. भारत आणि पाकिस्तानमधून दुबईत स्थायिक झालेले खेळाडू अमिराती संघातून खेळत आहेत. त्यामुळे ते आजच्या सामन्यात सरस ठरू शकतात.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.