END vs IND : 'बॅगा भरा घरी या...' चाहते खेळाडूंवर भडकले, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

टीम इंडियाला उपांत्य फेरीत झालेल्या दारुण पराभवामुळे ट्रोल
t20 world cup 2022 team india trolled
t20 world cup 2022 team india trolled
Updated on

टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेडमध्ये खेळल्या गेला. दुसरा उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. इंग्लंड 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत खेळणार आहे. टीम इंडियाच्‍या या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स पाऊस सुरु झाला.

या पराभवानंतर टीम इंडियाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या सामन्यात युझवेंद्र चहलला खेळवायला हवे होते, असे काहींनी म्हटले. गेल्या विश्वचषकातही खेळलो नाही. तर काहींनी केएल राहुलला तात्काळ संघातून काढून टाकण्याची मागणी केली.

सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. इंग्लंड संघाने 16 षटकात एकही बाद 170 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या. भारताच्या सहापैकी चार गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने 33 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकार मारले. हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेटवर बाद झाला. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली. भारताने शेवटच्या पाच षटकात 68 धावा केल्या.

हार्दिक आणि कोहली वगळता एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रोहित शर्मा 27 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने 14 धावा केल्या. ऋषभ पंत सहा आणि केएल राहुलने पाच धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने चार षटकांत 43 धावा देत तीन बळी घेतले. ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.