T20 World Cup : सर्व कर्णधारांनी मिळून अश्विनची केली गोची; भारतीय कर्णधार काय करणार?

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मंकडिंग रन आऊटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत
Mankading Run Out T20 World Cup 2022
Mankading Run Out T20 World Cup 2022sakal
Updated on

Mankading Run Out T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कपचा थरार उद्या म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी मंकडिंग रन आऊटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2022 सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या कर्णधारांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नॉन स्ट्राईक रन आऊट बाहेर पडणार की नाही हे स्पष्ट झाले.

Mankading Run Out T20 World Cup 2022
T20 World Cup : भारत-पाक कर्णधारांमध्ये चर्चा फक्त घर, गाडी बंगल्याचीच!

प्रेस कॉन्फरन्स दरम्यान जेव्हा कर्णधारांना विचारले गेले की, गोलंदाजांनी नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला धावबाद केले हे बरोबर असतील का? मांकडिंगच्या समर्थनार्थ असलेले कर्णधार हात वर करा, पण एकाही कर्णधाराने मंकडिंगच्या समर्थनार्थ हात वर केला नाही. मात्र या प्रश्नावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिथे नव्हता. त्याचवेळी उर्वरित कर्णधारांनी आपण मंकडिंगला पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय कर्णधार कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही.

Mankading Run Out T20 World Cup 2022
Babar Azam Birthday : बाबरचा बर्थडे झाला खास; सेलिब्रेशनला 16 कर्णधारांची लाभली साथ!

ऑस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार अॅरॉन फिंचला नॉन स्ट्राईक रन आऊट नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावाने लोकप्रिय मांकड यांच्यावर सातत्याने चर्चा होत असते. भारताच्या दीप्ती शर्माने गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान चार्ली डीनला अशाच पद्धतीने बाद केले होते. भारताने ही एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली होती. शुक्रवारी पावसामुळे रद्द झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने क्रीज सोडण्याबाबत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला इशारा दिला होता.

Mankading Run Out T20 World Cup 2022
विराट रोहितमुळे दोन चाहत्यांमध्ये खून खराबा, काय आहे प्रकरण?

नॉन स्ट्राईक रन आऊटची ही पद्धत आतापर्यंत अयोग्य पद्धतीने ठेवण्यात आली होती. परंतु ऑक्टोबरपासून लागू झालेल्या ICC नियमानुसार ते रनआउट म्हणून वर्गीकृत केले आहे. एमसीसीने नॉन स्ट्राईक रन आऊटला धावबाद म्हणून मान्यता दिली असली तरी, इंग्लंडचा कर्णधार बटलरनेही आपण अशा पद्धतीने बाद होण्याच्या बाजूने नसल्याचे सांगितले. तो म्हणाला, कोणीही ते पाहू इच्छित नाही कारण ते बॅट आणि बॉलने कामगिरी करण्याऐवजी त्यावर चर्चा सुरू करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.