लाहोर: क्रिकेट वर्ल्डकपच्या (Cricket world cup) इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतावर विजय मिळवला. मागच्या रविवारी टी २० वर्ल्डकपच्या सामन्यात बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तानी संघाने (Pakistan Team) भारताचा १० विकेट राखून पराभव केला. आयसीसी (ICC) स्पर्धेत प्रथमच पाकिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमने नाबाद ६८ धावांची खेळी केली. भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे हाय टेन्शनचा सामना असतो.
भारताविरुद्धच्या लढतीत बाबर आझम एकाबाजूला दमदार कामगिरी करत होता, त्याचवेळी व्यक्तीगत पातळीवर मात्र त्याला आईची चिंता होती. भारत विरुद्ध पाक सामन्याच्यावेळी आझमची आई व्हेंटिलेटरवर होती. शस्त्रक्रियेनंतर आझमच्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बाबरचे वडिल आझम सिद्दिकी यांनी ही माहिती दिली.
टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाची दमदार कामगिरी सुरु आहे. आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तीन विजय मिळवले आहेत. "माझ्या देशाला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. सलग तीन सामन्यात तीन विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. आमच्या घरी सुद्धा कसोटीचा काळ आहे. भारता विरुद्धच्या सामन्याच्यावेळी बाबरची आई व्हेंटिलेटरवर होती" असे आझम सिद्दिकी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तावर विजय मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.