T20 World Cup : ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. भारताने या सामन्यात केवळ चांगली गोलंदाजीच केली नाही, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अनेक खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ब्रिस्बेन येथे झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानी संघही आला होता.
पाकिस्तानचा या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुरू असताना पाकिस्तानी संघ मैदानात उतरला होता. भारत-ऑस्ट्रेलियाचा सराव सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे अनेक खेळाडू स्टँडवर उभे होते. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता इंग्लंड आणि पाकिस्तानचा सराव सामना होणार आहे.
सुपर-12 मध्ये टीम इंडियाचे मिशन 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. जो मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता आमने-सामने येणार आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, पण या दिवशी मेलबर्नमध्ये पाऊस पडू शकतो. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता 70 टक्क्यांपर्यंत आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद
राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.