T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी मोठा उलटफेर झाला. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात दुबळ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. या निकालासह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे.
आता गट 2 मधून उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोण असेल? पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर काही वेळाने त्याचा निर्णय होईल. हा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने गट-1 चे संपूर्ण समीकरणच बदलून गेले आहे.
भारतीय संघाचा शेवटचा गट सामना आज झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. आता जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल आहे, कारण टीम इंडिया सध्या आपल्या ग्रुप-2 मध्ये 6 गुणांसह अव्वल आहे. तर आफ्रिका संघ 5 गुणांसह बाहेर गेला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात अॅडलेडमध्ये सामना खेळल्या जात आहे. हे दोन्ही संघ आता 4-4 गुणांनी बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत जो संघ सामना जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. कारण ते आफ्रिकेपेक्षा एक गुण अधिक म्हणजे 6 गुण असतील.
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. यासाठी त्याला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सुपर-12 सामना जिंकावा लागेल. पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीत सामना पाहायला मिळू शकतो. ब गटातील भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचले तर भारताचा सामना इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होऊ शकतो. उपांत्य फेरीतील सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघ अंतिम फेरीत पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.