T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!

ICC T20 World Cup
ICC T20 World Cup
Updated on

नवी दिल्ली : आगामी T20 क्रिकेट वर्ल्डकपचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही स्पर्धा भारतातून युएईला स्थलांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीटीआयशी बोलताना दिली. T20 वर्ल्डकपचा हा मेगा इव्हेंट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. (T20 World Cup to be shifted from India to UAE confirms BCCI president Sourav Ganguly)

गांगुली म्हणाले, "T20 वर्ल्डकप भारतातून युएईमध्ये शिफ्ट करण्याबाबत आम्ही अधिकृतरित्या आयसीसीला कळवलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विविध प्रकारच्या सहभागींचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा युएईत होत असली तरी याचं यजमानपद बीसीसीआयचं भूषवेल असंही गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

ICC T20 World Cup
धोनीची रोहितबद्दल 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; हा घ्या पुरावा

T20 वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार का? या प्रश्नावर अद्याप या स्पर्धेचं शेड्यूल फायनल झालेलं नसल्याचंही सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा कधीपासून सुरु होईल हे अद्याप सांगता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. आयसीसीनं देखील हे स्पष्ट केलं आहे की या स्पर्धेच्या शेड्यूलवर काम झालेलं नाही.

ICC T20 World Cup
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

आयसीसीनं जून महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयला चार महिन्यांचा कालावधी दिला होता. आयसीसीनं म्हटलं होतं की, कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारत या स्पर्धेचं आपल्या देशात आयोजन करु शकेल का? याबाबत भारतानं आयसीसीला माहिती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.