T20 World Cup : आफ्रिदीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायचीय : बोल्ट

शहीन आफ्रिदीने गेल्या रविवारी आपल्या पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा (यॉर्करवर पायचीत) आणि केएल राहुलला (त्रिफाळाचीत) बाद केले होते, तेथूनन पाकिस्तानने वर्चस्व मिळवले होते
Trent Boult
Trent Boult sakal media
Updated on

दुबई : पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शहीन आफ्रिदीने सुरुवातीला स्विंग करून भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली, तसाच स्विंग करून वर्चस्व गाजवण्याचा इरादा न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने व्यक्त केला आहे.

Trent Boult
T20 WC बटलरची तुफानी खेळी; इंग्लंडनं उडवला कांगारुंचा धुव्वा

शहीन आफ्रिदीने गेल्या रविवारी आपल्या पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा (यॉर्करवर पायचीत) आणि केएल राहुलला (त्रिफाळाचीत) बाद केले होते, तेथूनन पाकिस्तानने वर्चस्व मिळवले होते. भारतीयांविरुद्ध अशीच कामगिरी करण्यासाठी बोल्ट सज्ज झाला आहे.शहीन आफ्रिदीची सुरुवातीची षटके मी पाहिली. त्याचे चेंडू चांगलेच स्विंग झाले होते. उद्याच्या भारताविरुद्धच्या सामन्यात अशाच प्रकारे स्विंग करून भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांवर वर्चस्व राखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बोल्ट म्हणाला.

Trent Boult
T20 World Cup 2021 : भारतासाठी अस्तित्वाची लढाई

उपांत्य फेरीची आठवण

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य सामन्यात बोल्ट आणि त्याचा सहकारी मॅट हेन्री यांनी रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना बाद करून भारताची ५ बाद ३ अशी दारुण अवस्था केली होती. त्यामुळे भारताला २४० धावांचे लक्ष्य गाठता आले नव्हते. भारताकडे विख्यात फलंदाज आहेत आणि त्यांना लवकरात लवकर बाद करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे बोल्ट म्हणाला. भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही बोल्ट यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांत आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आम्ही भारतावर नेहमीच विजय मिळवलेला आहे, ही आकडेवारी आमच्या बाजूने असली तरी आम्ही इतिहासापेक्षा वर्तमानाला अधिक प्राधान्य देतो, असे मत बोल्टने व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.