ICC Ranking : ॠतुराजची टी-२० क्रमवारीत झेप; सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ॠतुराज गायकवाड याने १३ स्थानांनी प्रगती केली असून आता तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
ICC Ranking
ICC RankingSakal
Updated on

दुबई : आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ॠतुराज गायकवाड याने १३ स्थानांनी प्रगती केली असून आता तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

आयसीसीच्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादव व ॠतुराज गायकवाड यांच्यासह यशस्वी जयस्वाल १०व्या स्थानावर आहे. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा एकमेव खेळाडू अव्वल १० जणांच्या यादीत आहे. अक्षर पटेल हे त्या खेळाडूचे नाव. तो नवव्या स्थानावर आहे. कुलदीप यादव ११व्या स्थानावर आहे. टी-२० विश्‍वकरंडकातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा १४व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज अदिल रशीद पहिल्या स्थानावर आहे.

ICC Ranking
ICC Ranking : भले शाब्बास! Ruturaj Gaikwad ची टॉप १० मध्ये एन्ट्री; शतकवीर अभिषेक शर्माचीही गगनभरारी

आयसीसी टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा याने पहिले स्थान कायम राखले आहे. भारताचा अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे.

भारत पहिल्या स्थानी

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. भारताच्या या संघाने आयसीसी टी-२० क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com