दहिवडी - मलवडी (ता. माण) येथील पार्थ विनोद मगर याने जॉर्डन येथे झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली. या त्याच्या यशामुळे माणदेशाचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकला आहे.
ऑलिंपिकमध्ये चमकलेली ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत आदींनी क्रीडा क्षेत्रात माणचा लौकिक देशात नव्हे तर जगात वाढविला आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत पार्थने टेबल टेनिस या खेळात जबरदस्त कामगिरी केली आहे.
बेस्ट कर्मचारी असलेल्या विनोद मगर यांचा मुलगा असलेला पार्थ हा सध्या मलवडी येथील महंत शांतिगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे, तर ठाणे येथील एसीई टेबल टेनिस ॲकॅडमीमध्ये आकाश कासार या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
२२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान जॉर्डन देशात अमान येथे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अठरा देशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पार्थ मगर याने पंधरा वर्षांखालील वैयक्तिक प्रकारामध्ये कास्यपदक जिंकले, तर पंधरा वर्षांखालील दुहेरीमध्ये दिव्यांशी भौमिक सोबत खेळताना अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
तसेच सतरा वर्षांखालील गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. पार्थ याच्या यशाबद्दल त्याचे मलवडी पंचक्रोशी क्रीडाप्रेमी, ठाणे येथील बेस्ट आर्टस् क्रीडा मंडळ, मुंबईकर नोकर मंडळी व मलवडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
वडिलांच्या प्रेरणेने मी या खेळाकडे वळलो. माझ्या यशात माझ्या आई-वडिलांसह माझ्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
- पार्थ मगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.