तालिबानी राजवटीने बदलला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष

Afghanistan-Cricket
Afghanistan-Cricket
Updated on

२०१९ वर्ल्ड कपपर्यंत असलेल्या अध्यक्षांची केली फेरनिवड

काबूल: अझीझउल्ला फजली (Azizullah Fazli) यांची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) कार्यकारी अध्यक्षपदी (acting Chairman) रविवारी नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी बोलवल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांनी पलायन केल्यानंतर तालिबान्यांना (Taliban) अफगाणिस्तान काबीज केले. त्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट जगतासंदर्भात ही पहिलीच मोठी घटना घडली. "ACB चे माजी अध्यक्ष अझीझउल्ला फजली यांची बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन:श्च नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळातील सर्व स्पर्धात्मक क्रिकेटबद्दलचे निर्णय घेण्याची जबाबदारी फजली यांच्यावर सोपवण्यात आली आहे", असे ट्वीट बोर्डाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आले.

फजली यांनी या आधी अतिफ माशल यांच्या राजीनाम्यानंतर सप्टेंबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान गुणतक्त्यात तळाशी राहिल्यामुळे फजली यांना पदावरून हटवून फरहान युसूफजाई यांना त्या पदावर नियुक्त करण्यात आले होते. फजली हे गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासाठी काम पाहत आहेत. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची पायाभरणी करणाऱ्या सुरूवातीच्या खेळाडूंपैकी ते एक आहेत. देशासाठी क्रिकेट खेळून झाल्यानंतर त्यांनी बोर्डाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष आणि सल्लागार ही पदेदेखील भूषवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.