तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग?

राजगोपाल सतिशचा मोठा आरोप; तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग?
Rajgopal Satish Alleged Match Fixing In Tamil Nadu Premier League
Rajgopal Satish Alleged Match Fixing In Tamil Nadu Premier Leagueesakal
Updated on

नवी दिल्ली : आयपीएल प्रमाणेच भारतात अनेक राज्यात एक प्रीमियर लीग खेळवली जाते. मात्र यामध्ये तामिळनाडू प्रीमियर लीग (Tamil Nadu Premier League) ही विशेष गाजते. कारण त्यामध्ये अनेक तामिळनाडूचे स्टार खेळाडूही सहभागी होत असतात. मात्र आता या तामिळनाडू प्रीमियर लीगला मॅच फिक्सिंगचे (Match Fixing) गोलबोट लागले आहे. (Rajgopal Satish Alleged Match Fixing In Tamil Nadu Premier League)

Rajgopal Satish Alleged Match Fixing In Tamil Nadu Premier League
FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

माजी आयपीएल (IPL) खेळाडू आणि रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळाडू राजगोपाल सतिशने (Rajgopal Satish) त्याला मॅच फिक्सिंग करण्यासाठी 40 लाख रुपयांची ऑफर आली होती असा दावा केला आहे. यानंतर बंगळुरु पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. राजगोपाल सतिश (Rajgopal Satish) हा तामिळनाडू कडून खेळला आहे. याचबरोबर तो आसामकडूनही खेळला आहे. तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघासोबत देखील जोडला गेला होता. 41 वर्षाचा हा खेळाडू सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) चेपॉक सुपर गिलीजकडून (Chepauk Super Gillies) खेळतो.

Rajgopal Satish Alleged Match Fixing In Tamil Nadu Premier League
VIDEO : विकीनं मिकीला टाकलेला हा चेंडू एकदा बघाच!

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'या आरोपांचा तपास करण्यासाठी विशेष तपास समिती नेमली आहे. आम्हाला वाटते की आरोपी जो स्वतःला बनी आनंद म्हणतो तो बंगळुरू मध्ये आहे.' बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला अशा प्रकरणात थेट चौकशी, शोध मोहिम आणि जप्तीचा अधिकार नाही. त्यांना यासाठी पोलिसांवरच अवलंबून रहावे लागते.

याबाबतची तक्रार बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटमधील बी लोकेश यांनी जयानगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत '3 जानेवारीला बन्नी आनंद नावाच्या एका व्यक्तीने सतिशशी इन्स्टाग्रामवरुन संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याला 40 लाखाची ऑफर दिली आणि अजून दोन खेळाडू यासाठी सहतम झाल्याचे सांगितले. सतिशने या व्यक्तीच्या ऑफरला नकार दिला.' असा उल्लेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.